औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव तालुक्यात संचार बंदीचा विक्रमी बंद ; ग्रामीण भागाची लाईफलाईन ठप्प

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सोयगावसह तालुक्यात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने ग्रामीण भागात संचार बंदीचा बंद पाळला,या बंदमुळे मात्र ग्रामीण लाईफलाईन ठप्प झाली होती.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर प्रशासनाकडून नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना चालू आहेत,त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून सामुहिक ठिकाणी न जमता नागरिकांनी कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आल्यावर मात्र शनिवार,आणि रविवार या दोन दिवस बंद पाळण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या,त्यामुळे रविवारी सोयगावसह तालुक्यातील ८७ गावातील ग्रामीण भागात शांततेत बंद पाळण्यात आला.सोयगाव शहरात मात्र कमालीचा शुकशुकाट पसरला होता.शहरातील सर्वच बाजार पेठा,व्यावसायिक दुकाने,आदींनी बंद पाळल्याने शहर बकाल झाल्याचे दिसून आले.ग्रामीण भागातही या बंदमुळे लाईफलाईन ठप्प झाली होती.
केंद्राच्या आदेशावरून रविवारी संचार बंदीची घोषणा लागू झाली होती,त्यामुळे नागरिकांनी पहाटे सहा वाजेपुर्वी अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करून कोरोना विषाणूचं संघर्षात सहभागी झाले होते.