बीड:आठवडा विशेष टीम― दि. २४ मार्च मंगळवारी मध्यरात्री २ वा. अज्ञात २ चोरट्यांनी लिंबागणेश येथिल रहिवासी पोलिस बापुराव नागनाथ निगुल यांचे मेन गेटचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला.बापुराव यांच्या बेडरुमला बाहेरुन कडी लावली.त्यानंतर त्यांचा मोर्चा स्वयंपाक घराकडे वळला.
त्याचवेळी शेजारी सुरेश वनवे यांना संशय आल्यामुळे त्यांनी बापुराव यांचे वडील नागनाथ निगुल यांना फोन केला.तेव्हा शेजारी झोपलेल्या नागनाथ यांनी घरासमोर दिसणा-या २ अज्ञात ईसमांशी काठीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान चोरांनी दगडाने हल्ला केल्याने एक दगड नागनाथ यांच्या पाठीत बसला.व त्यांना जखम झाली.
बाहेर आरडाओरडा झाल्यामुळे बापुराव यांच्या आईला जाग आली.त्यांनी बापुराव यांच्या खोलीची बाहेरुन बंद केलेली कडी काढली.तोपय़त चोरट्यांनी मोटार सायकल घेऊन पळ काढला होता. बापुराव आणि नागनाथ यांनी त्यांचा शंभर चिरा पर्यंत पाठलाग केला.परंतु चोरटे हाती लागले नाहीत.
नेकनुर पोलिस आणि लिंबागणेश पोलिस यांनी रात्रीच घटनास्थळी दाखल होऊन स्थळ पंचनामा केला.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी घटनेची माहिती भाऊसाहेब वाघमारे जमादार पोलिस चौकी लिंबागणेश यांना देताच त्यांनी लिंबागणेश पोलिस चौकिवर कार्यरत पोलिस राठोड याऩा घटनास्थळी पोहचण्याच्या सुचना देत तसेच नेकनुर पोलिस ठाण्यात सुचना देऊन पेट्रोललिंग करत असलेली पोलिस गाडि पाठवली आणि घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.