औरंगाबाद: सोयगावला पोलीस ,महसूल यांचा रूटमार्च ,कोरोना विषाणू जनजागृती ;घराबाहेर न पडण्याचे आवाहन

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
राज्यात अघोषित संचारबंदी लागू होताच कोरोना विषाणू बाबत सूचनांचे पालन करण्यासाठी सोयगाव तहसील आणि पोलीस यांच्या वतीने सोमवारी सायंकाळी शहरात रूटमार्च काढण्यात आल यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी शहराचा कानाकोपरा पिंजून काढत कोरोना विषाणूबाबत जनजागृती व शहरवासीयांना सूचनांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसार्गावर उपाय योजनांचा भडीमार सुरु झालेला असतांना त्याचाच एक भाग म्हणून सोयगाव शहरात सायंकाळी रूटमार्च काढून अघोषित संचार बंदीत नागरिकांनी घराबाहेर न पडण्याबाबत आवाहन करण्यात आले यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी शहरातील प्रत्येक भाग पायी पिंजून शहरवासीयांना आवाहन केले कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू झालेली असल्याचे शहरवासीयांना जनजागृतीद्वारे सांगण्यात आले आहे रूटमार्च मध्ये पोलिसांच्या वाहनातून स्पिकरद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या,यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी पोलीस निरीक्षक यांचेशी रूटमार्च मध्ये चर्चा करून कारवाई बाबत सूचना केल्या आहे.
रूटमार्च मधून शहरातून शहरातील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देवून कोणीही घराबाहेर न पडता पाच पेक्षा अधिक नागरिकांनी एकाच ठिकाणी जमू नये अशाही सूचना देण्यात येवून कायद्याबाबत सूचना देण्यात आल्या आहे.कोरोना विषाणूला न घाबरण्याचे आवाहन करण्यात आले याचेशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार प्रवीण पांडे यांनी केले.