बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीसामाजिकहेल्थ

बीड: कोरोना बाधित रुग्णांसाठी पत्रकार संघाची रुग्णवाहिका जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

बीड:आठवडा विशेष टीम― जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.बीड जिल्ह्यात परदेशातून व इतर जिल्ह्यातून आप - आपल्या गावात शेकडो प्रवासी आलेले आहेत.भविष्यात कोरोना व्हायरस संशयित रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सर्व उपाय करत आहे. भविष्यात कोरोना बाधित रूण्ण वाढले तर प्रशासनाच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची रूण्णवाहीका जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे विनामूल्य 24 तास सेवेसाठी सुपूर्द करण्यात आली. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी आणि जिल्हा संघटक अमजद खान यांनी रुग्णवाहिकेची चावी दिली.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवार दिनांक 23 मार्च रोजी दुपारी पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरस संदर्भात माहिती दिली. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार असून कोरोनाचा संसंर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी चार दिवसांपूर्वीच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोरोना आपत्तीत स्थानिक पातळीवर प्रशासनाला मदत आणि पत्रकारांना मास्क,इतर साहित्य लोकसहभागातून द्यावेत अशा सुचना दिलेल्या होत्या.त्यानुसार बीड जिल्हा शाखेने रूण्णवाहीका देण्याचा निर्णय घेतला.प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सेवेत कोरोना बाधित संशयित रुग्णांना ने - आण करण्यासाठी विनामूल्य 24 तास रुग्णवाहिका सेवार्थ हेतूने प्रशासनाकडे सुपूर्द केली. रुग्णसेवक पत्रकार अमजद खान यांच्या पुढाकारातून जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांच्या आवाहनानंतर रुग्णवाहिके वरील चालक शेख शाहेद यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित संशयित रुग्णांना ने - आण करण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सोमवार दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता रुग्णवाहिकेची चावी उपस्थित सर्व मान्यवर यांच्या समक्ष सुपूर्द केली. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, माहिती अधिकारी किरण वाघ, माहिती कार्यालयाचे ना.गो. पुटेवाढ, पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शेख आयूब्ब, पत्रकार संदीप बेदरे, संपादक प्रशांत सुलाखे, संपादक किसन माने, पत्रकार आत्माराम वाव्हळ, संपादक अभिमन्यू घरत, संपादक जुबेर फारुकी, संजय कुलकर्णी आदीची प्रमुख उपस्थिती होती. . विनामूल्य रुग्णवाहिका सेवेत हजर...... कोरोना संशयित बाधित रुग्णांना उपचारार्थ रूग्णालयात जाण्यासाठी आणि रुग्णालयातून घरी जाण्यासाठी विना मूल्य रुग्णवाहिका हवी असल्यास संबंधितांनी तात्काळ पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी 98 22 62 85 21, रुग्णसेवक तथा पत्रकार संघाचे जिल्हा संघटक अमजद खान 97 67 89 87 92 किंवा रुग्णवाहिका चालक शेख शाहेद मोबाईल क्रमांक 95 45 40 42 94 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,जिल्हा शाखा बीड च्या वतीने करण्यात आले आहे.