पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

नगरसेवक संदीप जाधव यांचा अभिनव उपक्रम घरोघरी जाऊन कोरोना विषय जनजागृती करून मोफत मास्कची केली वाटप

पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा नगरपंचायतचे प्रभाग नऊचे कार्यसम्राट दमदार नगरसेवक संदीप जाधव यांनी प्रभाग नऊ मध्ये सकाळ सकाळी घरोघरी जाऊन कोरोना विषय जनजागृती करून हा आजार किती भयंकर आहे याची माहिती सांगून कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारा पासून दूर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे व काय करुनय याची घरोघरी जाऊन माहिती सांगितली खोकला,ताप श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार घ्या कोरोना पासून सावधान राहण्यासाठी हे करा.साबण व पाणी वापरुन हात स्वच्छ धुवा,शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा,सर्दी किंवा फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा,मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा रोजची वापराची कपडे गरम पाण्याने धुवावे,अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावे नसता घरात बसून रहावे स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा ताप,खोखला श्वासोच्छवासात अडथळा लक्षणे आढळून आल्यास काळजी घ्या उपचारासाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा आशे आव्हान प्रभाव नऊचे कार्यसम्राट नगरसेवक संदीप जाधव यांनी केले आहे.