पुणे-मुंबईहून आलेल्यांना तपासणी करूनच गावात प्रवेश द्या– किशोर घुगे

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पुणे मुंबईहून आलेल्यांना तपासणी करूनच गावात प्रवेश देण्याची मागणी.प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर कोरोनाची तपासणी केंद्रे स्थापन करा…
कोरोनाचा संसर्ग जास्त वाढला असल्यामुळे मुंबई व पुणे येथून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकाचे लोंढे येत आहेत. मुंबई व पुण्याहून आलेल्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी कोरोना तपासणी केंद्रे स्थापन करावे. अशी मागणी प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार-प्रसार योजनेचे जिल्हाध्यक्ष किशोर घुगे यांनी निवेदनाद्वारे केली.ग्रामीण भागात येणार्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करावी तपासणी केल्यानंतर गांवामध्ये प्रवेश द्यावा जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखता येईल यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रावर उपकेंद्रावर कोरोना तापासणी केंद्र उभारावे आदी मागण्या केल्या आहेत.
ग्रामीण भागातील अनेक मजूर,कर्मचारी कामानिमित्त पुणे मुंबई येथे कामासाठी स्थायिक झाले होते.परंतू आता पुणे व मुंबई येथे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून त्यांना आप आपल्या गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागामध्ये मुंबई पुण्यामधून आलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्या ठिकानाहून येणार्या सर्वाची तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर योग्य त्या सोयी- सुविधा उपलब्ध कराव्यात. असे रूग्ण आढळून आल्यास त्यांना पुढील उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल करावे. जेणेकरून त्यांचा संसर्ग इतर ग्रामीण भागात होणार नाही यासाठीच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.दिलीप.एस.पोटोडे साहेब यांना मागणी करण्यात आली आहे.