बीड जिल्हाब्रेकिंग न्युजहेल्थ

लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी सज्ज –डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतने जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करत कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सरपंच सौ.निकीता स्वप्निल गलधर आणि ग्रामविस्तार अधिकारी तेलप , उपसरपंच शंकर वाणी ,. ग्रा.पं.स.गणेश लिंबेकर , सुरेश ढवळे, शेख समीर , विलास जाधव , निर्मळ दादा , बाबासाहेब गायकवाड , लहु थोरात आदिनी सर्व संमतीने ठराव संमत करण्यात आला की कोरोनाग्रस्त भागातुन आलेल्या सर्व नागरीकांची नोंदणी करुन प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणे तसेच गावातील सर्व तंबाखू व तंबाखजन्य पदार्थ विकणा -या पानटप-या व दुकाने ३१ मार्च पर्यंत बंद ठेवणे. कोरोना विषाणुचा प्रसार होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुकल्यास ५०० रु.दंड आकारण्यात येईल असेही दवंडी द्वारा कळवण्यात आले आहे.गावाति विविध चौकाचौकात पिण्याचे पाणी व साबणीची व्यवस्था केली आहे..कीराणा दुकानदारांनी १ मिटर अंतरावर रेषा करुन रांगेत किराना घेत आहेत.जिल्हाधिकारी बीड यांच्या वेळोवेळी येणा-या आदेशाचे पालन केले जाते.

प्राथमिक आरोग्य केंद्रात युद्ध पातळीवर तैयारी– डॉ.रुपाली राऊत

आज दिवसभरात तपासणी केलेल्या एकुण ४७ रुग्णांची तपासणी केली असता २४ रुग्ण कोरोनाग्रस्त भागातुन आलेले आहेत.त्यांची रजिस्टर नोंदणी करुन एनकेटो एक्सप्रेस फांर कोबो टुलबांक्स मधे रुग्णांची सविस्तर माहिती फीड केली जाते.माईल्ड लक्षणे असतील तर औषधोपचार केले जातात.सिरियस लक्षणे असतील तर बीडला सरकारी दवाखान्यात पाठवले जाते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    कोरोना संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन– डॉ.रुपाली राऊत

    कोरोनाग्रस्त भागातुन आलेल्या संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र विलिनीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.आज आलेल्या बेलगांव येथिल संशयित रुग्णांना होम कोरिएणटेशनचा हातावर शिक्का मारला गेला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश येथे २ वैद्यकीय अधिकारी , २ ए.एन.एम. , २ एच.ए. , सुपरवायजर , २ शिपाई ,. एक फामांसिस्ट तैनात आहेत.

    वैद्यकीय अधिकारी यांचे विशेष कौतुक– डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

    प्राथमिक आरोग्य केंद्रात टांयलेट सुविधा उपलब्ध नाही , मुक्कामी राहण्यासाठी कीचन ओटा नाही , बेसिन नाही ‌,नळ नाही , लाईट्स नाही.आदि.सुविधा नसताना कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य केंद्रात निवासस्थानी राहणा-या महीला वैद्यकीय अधिकारी याच विशेष कौतुक करावं लागेल.