औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगावला कोरोना संसर्ग उपाय योजनांचा आढावा , उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट ; अधिकाऱ्यांची कानउघाडणी

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―जिल्हाभरात कोरोना संसर्ग संक्रमण वाढण्याची चिन्हे असतांना जिल्हा प्रशासन सर्वच बाजूंनी सतर्क झाले असल्याने पहिल्या टप्प्यातील उपाय योजनांची ढावा मंगळवारी सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी घेतला आहे.यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या उपाय योजनांबाबत गावनिहाय आढावा घेतला व गावातील साथी बाबतची माहिती घेतली यावेळी बाहेरून आलेल्या रुग्णांची तपासणी करण्याबाबत सूचना केल्या.
कोरोना संसर्ग बाबत सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून या संकटावर सर्वांनी शासन व्यासपीठावर एकत्र येवून संघर्ष करायचं आहे.त्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये कोरोना संसर्ग हे मानवी संकट आहे.त्यामुळे सर्वांनी डोळ्यात तेल घालून यावर उपाय योजना कराव्या असे ब्रिजेश पाटील यांनी सांगितले.यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी तालुक्यातील स्थितीची माहिती दिली.सोयगाव तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.शासनाच्या सर्वच यंत्रणा कामाला लागल्या असून तालुका कोरोना संसर्गाच्या बाहेर असल्याचे पांडे यांनी बैठकीत सागितले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर कसबे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,नायब तहसीलदार मकसूद शेख,सतीश देशमुख,पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,आदींची उपस्थिती होती.

उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी यावेळी सोयगाव ग्रामीण रुग्णालयातील विलीगीकरण कक्षाची आणि संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील आयसोलेशन वार्ड ची पाहणी केली.