औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात अवकाळी पाऊस ; कापणीवर आलेली रब्बीचे पिके आडवी ,फळबागांचे नुकसान

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगावसह तालुक्यावर गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाचे संकट आल्याने तालुक्यात विविध भागात झालेल्या तासभराच्या अवकाळी पावसाने रब्बीचे पिके आडवी केली आहे.या अवकाळी पावसात सखल भागातील शेतात चक्क पाणी साचले होते,त्यामुळे पुन्हा खरिपापाठोपाठ रब्बीच्या पिकांनाही जलसमाधी मिळाली.
सोयगावसह तालुक्यात बुधवारी दुपारी अचानक अवकाळी पावूस बरसल्याने कापणी वर आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.अवकाळी पावसासोबतच वादळी वारे आणि विजांचा कडकडात असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्याच्या तडाख्यात कापणी वर आलेल्या ज्वारी,बाजरी आणि मका पिके आडवी पडली असून काही भागात कापणी करून ठेवलेल्या मका पिकांना पुन्हा पाण्यात जलसमाधी मिळाल्याने खरिपाच्या हंगामातही झालेल्या अवकाळी पावसाची पुनरावृत्ती रब्बीच्या हंगामातही झाली आहे.सोयगाव तालुक्यात काही भागात मका पिकांची कापणी करून शेतात पडून होती,कोरोना संसर्गाच्या भीतीने सध्या शेती कामे ठप्प असल्याने या कापणी करून ठेवलेल्या मका पिके त्याच स्थितीत शेतात पडून अवकाळीच्या साचलेल्या पाण्यात कुजला आहे.त्यामुळे रब्बीच्या हंगामालाही अवकाळीचे ग्रहण लागले आहे.

जरंडी परिसरातील पाच गावात मुसळधार-
जरंडी,निंबायती,न्हावीतांडा,निंबायती गाव,रामपुरा,बहुलखेडा,कवली,घोसला ,या गावांना अवकाळीचा मुसळधार तडाखा बसला आहे.जरंडीच्या काही भागात किरकोळ स्वरुपात गारांचा पावूस झाला आहे.

राज्यभर कोरोना संसर्गाचे संकट असतांना सोयगाव तालुक्यावर पुन्हा अवकाळीचे संकट कोसळले आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात दुहेरी संकटाच्या कचाट्यात अडकल आहे.दरम्यान आधीच लागू असलेली संचार बंदी अवकाळी पावसामुळे अधिकच तीव्र झाली होती.

Previous post सोयगावला कोरोना संसर्ग उपाय योजनांचा आढावा , उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट ; अधिकाऱ्यांची कानउघाडणी
Next post सोयगावात वाढले ‘सोशल डिस्टंस’ ; मेडिकल,किराणा दुकानांबरोबरच शासकीय दवाखाने,भाजी पाला विक्रीसाठी नवी पद्धत