औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसोयगाव तालुका

सोयगावात वाढले ‘सोशल डिस्टंस’ ; मेडिकल,किराणा दुकानांबरोबरच शासकीय दवाखाने,भाजी पाला विक्रीसाठी नवी पद्धत

सोयगाव,ता.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टंस ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाचे सोयगावात काटेकोरपणे पालन होताना दिसत आहे.त्यामुळेच जवळजवळ सर्वच मेडिकल दुकान,प्राथमिक आरोग्य केंद्रे, बँका, किराणा दुकानांबरोबरच भाजी विक्रेत्यांच्या दुकानांसमोर पांढरे पट्टे मारून ग्राहकांना एकमेकांत तीन फुटांचे अंतर ठेवण्यास सांगितले जात आहे.
‘कोरोना’चा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली आहेत. पण, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वस्तूंच्या दुकानांसमोरच गेल्या काही दिवसांपासून गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे ‘सोशल डिस्टंस’चा आग्रह धरला जात आहे. याच पार्श्वभूमीवर,तहसीलदार प्रवीण पांडे यांनी गुरुवारी तालुक्यात जनजागृती घेवून मेडिकल दुकान, बँका, किराणा दुकान, भाजी विक्रेत्यांच्या दुकाने यासमोर पांढरे पट्टे मारून तीन फुट अंतर ठेऊन उभे राहण्याची सूचना देण्यात आली आहे.तर काही ठिकाणी वेगवेगळ्या दोन रांगा लावून,एकमेकांत अंतर ठेऊन उभे राहायला सांगितले जात आहे.

बँकामध्ये एकावेळी दोन ते तीन जणांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे. तर एटीएमबाहेर गर्दी करू नका, असे सांगितले जात आहे.याबाबत जनजागृती करण्यासाठी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी थेट बनोटी ता.सोयगाव प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून त्या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उचित अंतरावर राहण्याबाबतचे मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा घावटे यांना दिले.यावेळी नायब तहसीलदार मकसूद शेख यांनी उपचारासाठी आलेल्या रुग्नान्च्घी माहिती घेतली.