औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसोयगाव तालुका

जीवनाश्यक वस्तूंची चढ्या भावात विक्री ; सोयगाव तालुक्यातील स्थिती ,जरंडीला मनमानी

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― दिवसांच्या लॉकडाऊनचा फायदा घेत सोयगाव तालुक्यात विक्रेत्यांनी जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावात विक्री करत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संघपाल सोनवणे यांनी दिल्यावरून त्यावर वचक बसविण्यासाठी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी उपाय योजना हाती घेतल्या आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला असतांना मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत मात्र भाववाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यात येत असल्याची तक्रार संघपाल सोनवणे यांनी सोयगाव तहसील कार्यालयात केल्यावरून यावर प्रतिबंध करण्यासाठी तहसीलच्या पथकाकडून पुरवठा विभागाला पाचारण करण्यात आले आहे.त्यामुळे आता तहसील कार्यालयाचा पुरवठा विभाग यावर नियंत्रण ठेवणार असून कारवाईचा बडगा हाती घेणार आहे.सोयगाव तालुक्यात किराणा,भाजीपाला,दुध,आदी जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या भावात विक्री करण्यात येत आहे.याप्रकारामुळे मजुरांना जास्तीची रक्कम दिल्यासच वस्तू मिळतात असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.यावरून तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दखल घेत स्वतंत्र समिती स्थापन केली असून या समितीकडे प्राप्त विक्रेत्यांच्या तक्रारींवरून कारवाई करण्यात येणार आहे,वजन मापे निरीक्षक मात्र या कारवाई बाबत अनभिज्ञ असल्याने वजनातही काटकसरपण करण्यात येत आहे.वजन मापे निरीक्षक यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत केली आहे.

जरंडीला मोठ्या प्रमाणावर मनमानी-

जरंडी ता.सोयगाव येथे या प्रकाराबाबत मोठी मनमानी सुरु असून किराणा दुकानदार आणि भाजीपाला विक्रेत्यांनी चढ्या भावात विक्री करण्याचा सपाटा लावला आहे.याबाबत तहसीलदार प्रवीण पांडे यांनी तातडीने जरंडीला चौकास्धी करण्याचे आदेश दिले आहे.

१)जरंडी ता.सोयगाव येथील एका किराणा दुकानात तेल घेण्यासाठी गेलो असता,संबंधित दुकानदाराने माझ्याकडून अव्वाच्या सव्वा भाव लावले होते याबाबत चौकशी केली असता आमचे धंद्याचे हेच दिवस असल्याचे संबंधित दुकानदाराने सांगितले असल्याची प्रतिक्रिया तोसीफ शेख यांनी दिली.

सोयगाव तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावात विक्री असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून तातडीने पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.नायब तहसीलदार नाना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती स्थापन करण्यात आलि आहे,संबंधितांनी त्यांचेशी याबाबत संपर्क साधावा.
– प्रवीण पांडे
तहसीलदार सोयगाव