परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारण

परळी पिंपळा अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्ग 548 ब च्या कामाची वर्क ऑर्डर मिळाली नाही―वसंतराव मुंडे

परळी:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे कामे चालू असून त्यामध्ये बीड जिल्ह्यात अंतर्गत परळी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग परळी वैजनाथ पिंपळा अंबाजोगाई रस्त्याचे काम न झाल्यामुळे सर्व जनतेला येण्याचा व जाण्याचा खूप मोठा त्रास झाला रस्ता दोन्ही बाजूने खोदून टाकला होता मुदतीच्या आत काम न झाल्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारकडे चौकशी करण्यासंदर्भात तक्रार दाखल शासनाकडे काँग्रेसचे नेते चेअरमन वसंत मुंडे श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केलेली आहे त्यामुळे जुने गुत्तेदार व त्यांनी केलेली कामे त्यांना दिलेली बिले आणि अंदाजपत्रकाच्या नियमाप्रमाणे काम न करताही 35 कोटीची बिले अदा केलेली आहेत त्यामुळे दोन्ही स्तरावरची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय केंद्र सरकारकडून वर्क ऑर्डर देण्यात आलेले नाही अनेक जुन्या कामासंदर्भात गुत्तेदार व टेंडर च्या कामाबाबत चुका निदर्शनास आलेल्या आहेत करिता परळी अंबाजोगाई पिंपळा काम होते का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे असे काँग्रेस नेते वसंत मुंडे म्हणाले केंद्र व राज्य सरकार कडे निवेदन देऊन कामाची गुणवत्ता व भ्रष्टाचारासंदर्भात गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे टेंडर रद्द झाले व नव्याने टेंडर ओपन झाले त्यामध्ये औरंगाबादचे कंपनी AGC R SBIPL JV सुटले आहे ज्या अधिकाऱ्यांनी बोगस कामास व कामाला मुदतवाढ देण्यात आली त्यात कनिष्ठ अभियंता उपविभागीय अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता जबाबदार आहेत करिता विशेष दक्षता पथक नेमण्यात संदर्भात शासनाकडे हालचाली वसंत मुंडे यांच्या तक्रारी अर्जावरून चालू आहेत तात्काळ चौकशी पथक दिनांक 2/1/2020ला स्थापन झाले असून चौकशी करून निलंबित करण्यासंदर्भात व यांच्यावर एफ आय आर करण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी शासनाकडे मागणी केली असून त्यांची नोंद घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत अनेक अपघात झाली पावसामध्ये गाड्या स्लिप झाल्या येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला रस्ता खराब असल्यामुळे पाठीच्या कण्याचे आजार झाले तसेच धुळीमुळे दम्यासारखे रोग झाले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित सह्याद्री गेस्ट हाऊस मुंबई येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली त्यामध्ये परळी पिंपळा आंबेजोगाई राष्ट्रीय महामार्ग गेल्या तीन वर्षापासून का विलंब झाला आहे. त्यासंदर्भात अहवाल राज्य सरकार कडून केंद्र सरकारने मागवलेले आहे परत दिनांक 28 /1 /2020 ला काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी नितीन गडकरी परिवहन मंत्री यांच्याकडे दिल्ली येथे निवेदनाद्वारे तक्रार परळी अंबाजोगाई रस्त्या संदर्भात पुराव्यासहित तक्रार दाखल केली आहे वसंत मुंडे यांच्या तक्रारीवरून संबंधित अधिकारी व गुत्तेदार यास जबाबदार धरले आहे करिता नवीन कामाची आजतागायत वर्क ऑर्डर देण्यात आली नाही कारण जुन्या कामांमध्ये अनेक नियमाचे उल्लंघन झालेले आहे त्यामुळे 3 महिने झाले तरीही नवीन कामा सुरूवात झालेले नाही जोपर्यंत सम्पूर्ण कामाच्या गुणवत्ते संदर्भात परिवहन विभागामार्फत चौकशी केली जात नाही तोपर्यंत वर्क ऑर्डर देण्यात येते का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्‍यामुळे कामास विलंब लागण्याची शक्‍यता आहे अशी माहिती वसंत मुंडे काँग्रेसचे नेते यांनी दिली आहे जुने काम कोणत्या दर्जाचे झाले आहे राष्ट्रीय महामार्गाचे सर्व नियमाचे उल्लंघन झाले यास कोण जबाबदार अधिकारी का गुत्तेदार आहे या सर्व बाबी तपासूनच पुढील कारवाई करण्याचे आदेश भारत सरकार कडून राष्ट्रीय महामार्ग संदर्भात देण्याची शक्यता आहे असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी माहिती दिली आहे.