जळगाव:आठवडा विशेष टीम― जगासोबत आपल्या भारत देशात व राज्यात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविला असून संपूर्ण देश या महामारीच्या लढाईत सामील झाला आहे. यासाठी भारत सरकार कडून व राज्यसरकार कडून अतोनात प्रयत्न होत आहेत परंतू कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने तो गुणकाराच्या पटीने वाढतच चालला आहे आधी २२ मार्च रोजी एक दिवसासाठी जनता कर्फ्यू पाळला गेला आणि ३१ मार्च पर्यंत जमावबंदी व संचारबंदी लागू केली परंतू दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चाललेली पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी चक्क देशभर संचारबंदी द्वारा १४ एप्रिल पर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नका २१ दिवस आदेश पाळा व कोरोना टाळा नाही तर आपण २१ वर्ष मागे जाऊ या शब्दात भावनिक आवाहन केले. राज्याची परिस्थिती देखील भयानक असल्याचे पाहून तसेच इतर सर्व घटक केंद्र व राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे पाहून व मदत करत असल्याचे पाहून तसेच पोलीस बांधव,सर्व यंत्रणा , डॉक्टर्स नर्सेस आदरणीय पत्रकार बांधव राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय राब राब राबत असल्याचे पाहून व बरेचसे आमदार-खासदार साहेबांनी आपले एक महिन्याचे वेतन दिल्याचे पाहून प्रेरणा घेत राज्य समता शिक्षक संघाकडून तसेच महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग राज्य समन्वय समितीचे वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री याना राज्यातील शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कपात करण्याचे पत्र देण्यात आले आहे. समता शिक्षक संघाचे राज्याचे महासचिव तथा राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना शिक्षण विभाग राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक राज्य शासन आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी देखील ही राज्यातील सर्व घटकांची संयमाची शिस्तीची व कसोटीची वेळ आहे असे सांगून स्वतः व पत्नीचे मार्च महिन्यातील एक दिवसाचे वेतन आपल्या गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत कपात साठी पुढाकार घेतला असून त्यांनी राज्यातील शिक्षकांना एक प्रकारचे भावनिक आवाहन केले आहे.तसेच केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व सुचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे आपले नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार सर्वांना आपल्या स्वतःच्या घरीच थांबण्याचे आवाहन करावे .सर्वजण शिस्त संयम व समन्वयातून लवकरच या संसर्गजन्य वैश्विक आजारावर मात करतील असा आशावाद व्यक्त केला आहे.व सर्व घटकांनी राज्य सरकारच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी मदतीसाठी पुढे यावे असे म्हटले आहे.