अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

कोरोनाबाबत सोशल माध्यमांद्वारे पसरणाच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये ; गर्दीत जाणे टाळावे–राजकिशोर मोदी यांचे आवाहन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत.मा. जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार अंबाजोगाई नगरपरिषदेच्या माध्यमातून याबाबत जनजागृती, स्वच्छता,औषध फवारणी इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.कोरोना विषाणू आजाराबाबत सोशल माध्यमाद्वारे पसरणा-या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.गर्दीत जाणे टाळावे,तसेच सामाजिक शिष्टाचार पाळून दक्षता बाळगावी.परंतू,भीती बाळगू नका असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

कोरोना विषाणू आजाराची लक्षणे,उपाययोजना, सद्यःस्थिती आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबतही मोदी यांनी माहिती देवून आवाहन केले आहे की,कोरोना विषाणू आजाराची लक्षणे ही साध्या सर्दी- खोकल्यापासून ते विविध गंभीर आजारांसाठी कोरोना विषाणू हे कारणीभूत असतात.आजाराची लक्षणे ही मुख्यत: श्वसन संस्थेशी निगडित म्हणजेच इन्फ्लुएन्झा आजारा सारखीच असतात.सर्दी, खोकला,श्वास घ्यायला त्रास होणे,ताप,डोकेदुखी,निमोनिया होणे अशी लक्षणे साधारणपणे आढळतात. सर्वसाधारणपणे हा आजार शिंकण्यातून व खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून तसेच स्पर्शाने, आजारी व्यक्तीचे संपर्कात आल्यानंतर पसरतो.यासाठी घ्यावयाची खबरदारी अशी की,श्वसन संस्थेचे विकार असणा-या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घ्यावी.हात वारंवार धुवावे.शिंकताना आणि खोकताना नाका-तोंडावर रूमाल अथवा टिश्यू पेपर धरावा.योग्य आहार घ्यावा. फळे-भाज्या धुवूनच खाव्यात.श्वसनास त्रास होणा-या व्यक्तींनी हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे.हे स्पष्ट होत नसल्यास व रूग्णाने तसेच प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात,शहरात प्रवास केला आहे.अशा व्यक्तींनी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.कोरोना विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

नागरिकांना आवाहन

बीड जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू आहे.तसेच या आदेशाचे उल्लंघन
करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संचारबंदी शिथलीकरण आहे.त्यामध्ये ज्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे.कृपया त्या घरातील एका व्यक्तीनेच घराबाहेर पडावे.इतरांनी घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने,स्टोअर,भाजीपाला विक्रेते यांच्या दुकानांसमोर गर्दी करू नये.अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाकडून शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.कोरोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे,चुकीचे,भीती उत्पन्न करणारे संदेश कोणीही सोशल मिडियावर पाठवू नयेत.विविध अधिकृत स्रोतांकडून खात्री करून घेतल्याशिवाय याविषयीचे संदेश पुढे पाठवू नयेत.तसेच आवश्यक असल्यास हेल्पलाईनला फोन करून शंका निरसन करून घ्यावे.सर्दी,ताप, खोकला या लक्षणांनुसार रूग्णांवर स्वाराती शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उपचार केले जात असून सर्वांनी रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करावेत.कृपया गर्दीत जाणे टाळावे.वारंवार हात धुवावा.शिंकणे,खोकल्यातून बाहेर पडणाच्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रूमाल ठेवावा व सामाजिक शिष्टाचार पाळावेत असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी जनतेला केले आहे.