कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई नगरपरिषदेची औषध फवारणी

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी अंबाजोगाई नगरपरिषद सज्ज झाली आहे.शहराचे 4 विभाग करून तिथे भाजीपाला,फळे विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.रस्ते-गटारींची दैनंदिन सफाई,कचरा संकलना सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई नगरपरिषदेची निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी आणि पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.परदेशातून आणि मुंबई,पुणे आदी कोरोनाचा संसर्ग झालेल्या शहरातून अंबाजोगाईत आलेल्यांचा तसेच कुणाला सर्दी,खोकला किंवा ताप यासारखी लक्षणे आहेत काय याबाबतचा प्रत्येक प्रभागात आरोग्य विभागाच्या यंञणेमार्फत घरोघरी जाऊन माहीती घेतली जात आहे.

26 मार्च पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई नगरपरिषदेची निर्जंतुकीकरणासाठी हॅण्डपंप,ट्रॅक्टर,जीप, अॅपेऑटो यांना पंप बसवून मुख्य रस्ते,प्रभागातील रस्ते,सार्वजनिक ठिकाणे, नाल्या या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे.शुक्रवार,दिनांक
27 मार्च रोजी प्रभाग क्रमांक 8 प्रशांतनगर येथे
औषध फवारणी करण्यात आली.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपनगराध्यक्ष बबन लोमटे,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक संजय गंभीरे,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनील व्यवहारे,नगरसेवक आसेफोद्दीन खतीब, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे,पञकार अविनाश मुडेगावकर,प्रशांत बर्दापूरकर,अभिजीत गाठाळ,परमेश्वर गित्ते, सतिश मोरे,नागेश औताडे, नंदकुमार पांचाळ,राणा चव्हाण,अजिम जरगर, योगेश डाके यांचे सहीत नगरपालिकेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी, प्रभागातील नागरीक उपस्थित होते.शुक्रवार पर्यंत प्रभाग क्रमांक 14,1,9,8 मधील प्रशांतनगर,गुरुवार पेठ, गांधीनगर,रमाई चौक परिसर,तथागत चौक, यशवंतराव चव्हाण चौक, लालनगर,वडारवाडा,रायगडनगर,कबीरनगर,महसूल कॉलनी या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली असून लवकरच संपुर्ण अंबाजोगाई शहरात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील मुंबई,पुणे यासारख्या कोरोना संसर्गित शहरातून अंबाजोगाई मध्ये आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे.त्यांना आपापल्या घरातच स्वतंत्र राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.या नागरिकांकडून त्याचे पालन होत आहे.नगरपालिके तर्फे आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचा-यांची नियमीत आरोग्य तपासणी करवून घेण्यात येते.त्यांना मास्क,हॅण्डग्लोज,सॅनिटायझर,साबण आदी वस्तु पुरविण्यात येतात.स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात त्यांना विशेष. सूचनाही देण्यात आल्या आहेत.नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी,उपनगराध्यक्ष बबन लोमटे,माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेची यंत्रणा कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

घंटागाडीवरून आवाहन..!
कोरोनाचा संसर्ग आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी,फैलाव रोखण्यासंदर्भातील आवाहन कचरा गोळा (संकलन) करणा-या घंटागाडीवरील तसेच इतरही वाहनाद्वारे लाऊड स्पिकरवरून दररोज करण्यात येत आहे अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांनी दिली.

अंबाजोगाई शहरात 4 ठिकाणी मिळणार भाजीपाला..!

संचारबंदीच्या काळात नागरिकांना भाजीपाला, फळे आणि जीवनावश्यक वस्तू आपापल्या घरानजीक उपलब्ध व्हाव्यात यासाठी अंबाजोगाई नगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण शहरातील सर्व प्रभाग व परिसर यांची 4 विभागात विभागणी केली आहे. या ठिकाणी भाजीपाला खरेदी -विक्री केंद्रे सुरू आहे अशी माहिती नगराध्यक्षा सौ. रचना सुरेश मोदी यांनी दिली.


Previous post कोरोनाबाबत सोशल माध्यमांद्वारे पसरणाच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये ; गर्दीत जाणे टाळावे–राजकिशोर मोदी यांचे आवाहन
Next post लिंबागणेश येथे राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा ते पाटोदा मार्गावर जिल्हाप्रशासनाच्या आदेशानुसार वाहन जप्ती ,पोलिसांची कठोर कारवाई― डॉ.गणेश ढवळे