लिंबागणेश येथे राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा ते पाटोदा मार्गावर जिल्हाप्रशासनाच्या आदेशानुसार वाहन जप्ती ,पोलिसांची कठोर कारवाई― डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― बीड जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या असुन जिल्हा पोलिस अधीक्षक बीड मा.हषं पोद्दार साहेब यांनी संचारबंदी कालावधी मधे विनाकारण फीरणारे व शासन आदेशाची पायमल्ली करणारे , व कोरोना आजाराचे गांभीर्य न समजणारे आणि ईतरांचा जीव धोक्यात टाकणारे यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात यावी असे आदेश पारित केले आहेत.

लिंबागणेश पोलिसांनी गाड्या जप्त केलेल्या , आरोग्य सेवेला कागदपत्रे पाहुन सवलत – जी.बी.वाघमारे ( जमादार पोलिस चौकी लिंबागणेश )

बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल पोलिस चौकी जमादार जी.बी.वाघमारे , सहकारी शिंदे , सोनावणे यांनी राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा ते पाटोदा या ठिकाणी सक्तीने वाहनांची झाडाझडती सुरू केली असुन येणा-या, जाणा-या दोनचाकी , चारचाकी वाहनांची संचारबंदी कालावधी मध्ये तपासणी सुरू असुन केवळ आरोग्य सेवेसाठी त्यांची कागदपत्रे तपासून त्यांना नियम समजावून सुट दिली जाते. ईतर ठिकाणी मात्र वाहने जप्त करण्यात येऊन. वाहनांची कागदपत्रे ताब्यात घेऊन पोलिस चौकीत जमा केली आहेत. पुढील कारवाई वरीष्ठांच्या आदेशानुसार केली जाईल असे जमादार जी.बी. वाघमारे यांनी सांगितले.


Previous post कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई नगरपरिषदेची औषध फवारणी
Next post औरंगाबाद: सोयगावला उन्हाची लाट ; कोरोना संसर्गाचा धोका नाही