औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसोयगाव तालुका

औरंगाबाद: सोयगावला उन्हाची लाट ; कोरोना संसर्गाचा धोका नाही

सोयगाव,दि.२९:आठवडा विशेष टीम―
सोयगावसह तालुक्यात रविवारी तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे.त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत लॉकसावून अधिकच तीव्र झाल्याचे दिसून आले होते.सोयगाव तालुका डोंगराच्या पायथ्याशी असल्याने उन्हाची वाढती तीव्रता निर्माण होते.त्यामुळे मात्र कोरोना संसर्गाचा धोका सोयगाव तालुक्याला टळला असल्याचे मत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
सोयगावसह तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेची आठवड्यापासून समतोलपणा असल्याने रविवारी विक्रमी उन्हाची नोंद झाली आहे.रविवारच्या उन्हात अक्षरशः तालुका तपाल्याचे पहावयास मिळाले.त्यामुळे लॉकडाऊनची संचारबंदी अधिकच तीव्र झाली होती.दरम्यान वाढत्या उष्णतेच्या झळांनी मात्र तालुकावासी उकाड्याने त्रस्त झाले होते.मात्र या उन्हाचा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी होत असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे.त्यामुळे कोरोना संसर्गापासून सोयगाव तालुका कोसो दूर आहे.