बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीशेतीविषयक

कोरोनाने कीसानपुत्राच्या टोमॅटोची माती केली ,प्रशासनाने दखल घ्यावी ,माफक अपेक्षा–डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे मसेवाडी येथिल दिनकर आणि बाबासाहेब या मोरे बंधूंनी एक एकर २० गुंठे शेतात टोमंटोचे उत्पादन घेतले , मल्चिंग , औषधं फवारणी ,ठिबक सिंचन आदि.गोष्टींचा अंदाजे दीड लाख रू खर्च झाला. उत्पादन सूद्धा भरपुर आहे,परंतु कोरोना विषाणुचा नायनाट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन राबवल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत.

दिनकर मोरे: मोठ्या कष्टाने पिकवलेला टोमॅटो आता कोरोना रोगाच्या निमुलनासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या यंत्रनेमुळे शेतातच नासणार . व्यापारी ,दलाल गैरफायदा घेऊन मातीमोल भावाने माल घेतात. बाजारात पाठवणे परवडत नाही.

जनाबाई मोरे:टोमॅटोची लागवड करण्यापासून ८-१० महीला मजूर शेतात काम करतात, त्यांना २५० रु. रोज मजुरी द्यावी लागते.परंतु सध्या कोरोना आजाराच्या भितीने मजुर कामावर येत नाहीत.

अविनाश रंदवे: शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत हालाखीची असुन मोठ्या कष्टाने पिकवलेला टोमॅटो , हातातोंडाशी आलेला घास कोरोना विषाणुच्या निमित्ताने घशातुन हीरावुन घेतला आहे.सरकारने मदतीचा हात पुढे करावा.

डॉ.गणेश ढवळे:पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी , मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , मा.धनंजयजी मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड , मा.राहुलजी रेखावार यांनी कोरोना विषाणुचा नायनाट झाल्यानंतर सर्वांत प्रथम शेतकरयांना आथिंक मदतीचा आधार द्यावा.कोरोना विरोधात लढाईत सर्व शेतकरी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार काम करतील आणि कोरोना विरोधातील लढाई जिंकतील हा विश्वास आहे.