कोरोना विषाणू - Covid 19जळगाव जिल्हापाचोरा तालुका

शेंदुर्णीत डॉ. सागर गरुड व सिद्धार्थ लुणीया यांच्या वतीने गोरगरिबांना धान्याचे वाटप

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सध्या जगाला हादरून टाकणाऱ्या करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठाणे बंद आहे.यामुळे संचारबंदी सारखे वातावरण आहे.यामुळे निराधार, गोरगरीब लोकांना उदरनिर्वाह करण्यास फारच अडचणी येत आहे.सामाजिक भान व राष्ट्रीय कर्तृत्व म्हणुन विघ्नहर्ता हाँस्पिटल पाचोरा चे डॉ. सागर गरुड व सामाजिक कार्यकर्ते ,प्रतिष्ठित व्यापारी सिद्धार्थ लुणीया यांच्या वतीने शेंदुर्णीत २५० गोरगरीब व्यक्ती व परिवारास महिनाभर पुरेल एवढे धान्य ,जीवनावश्यक वस्तुंचे घरोघर जाऊन वाटप करण्यात आले.
डॉ. सागर गरुड यांनी आपले वैद्यकीय कर्तव्य म्हणुन रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीसाठी विघ्नहर्ता हाँस्पिटल पाचोरा येथे OPD सुद्धा सुरु ठेवली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन नागरिकांनी डॉ.सागर गरुड यांना या उपक्रमा बद्दल धन्यवाद दिले आहे.