कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजरोजगार

लिंबागणेश गावातील किराणा दुकानदारांनी असहकार आंदोलन पुकारत बंद पुकारला, सामाजिक कार्यकर्ते यांनी बंद मोडुन काढला– डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―गेल्या आठवडाभरात ग्रामस्थांच्या तक्रारी केल्या होत्या की किराणा दुकानदार चढ्या भावाने विक्री करत असुन आथिंक फसवणूक होत आहे.त्यासंबधी भरपुर जणांनी तक्रारी जमादार वाघमारे साहेब यांच्याकडे केली व सोशल मीडिया मध्ये पोष्ट टाकल्या. त्यामुळे किराणा दुकान दारांनी आपसात ठरवुन सर्व दुकाने बंद ठेवली होती.

भागचंद & पवन संचेती किराणा दुकानदार

मालाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.मोठ्या मेहनतीने माल मिळवावा लागतो, गाडी भाडेवाढ झाली आहे. काही ग्राहक विनाकारण हुज्जत घालतात, शिवीगाळ करून चढ्या भावाने विक्री करतात म्हणुन वैतागाने दुकान बंद केले होते.

लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी त्यांना पक्के बिलं द्या–डॉ ढवळे

तुम्ही नावाच्या किंमती छापील ठेवा. यावर जर कोणी तुम्हाला त्रास दिला तर पोलिस चौकी जमादार वाघमारे यांना फोन करून त्यांच्या कडे तोंडी अथवा लेखी तक्रार दाखल करा.परंतु गोरगरीब जनतेची अडवणूक करू नका.

त्यानंतर दुकाने उघडण्यात आली आणि व्यवहार सुरळीत पार पडू लागले.