कोरोना विषाणू - Covid 19पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बीड: पाटोदेकर सुरक्षित रहावे म्हणून रस्त्यावर लढणारा योध्दा सुनील भाऊ जावळे

पाटोदा:गणेश शेवाळे― आपला परिसर सिल केला आहे,कोणीही घरातुन बाहेर पडू नका हा आवाज रोज कानी येतो त्याचेही व्हिडीओ आपण सोशल माध्यमांवर पाहिला असेल. तो आवाज होता सुनिल भाऊ जावळे.
प्रत्येक वेळी बॉर्डरवर हातात बंदुक घेऊन लढले तर देशसेवा होते आसे नाही.तुमच्याकडे आसणा-या साधनसामग्रीने तुम्ही देशसेवा करु शकता.यांच्या कडील साधने आहेत
१) रिक्षा २) स्पिकर व माईक साच साधनसामग्रीने सुनील जावळे गेल्या अनेक दिवसा पासून कोरोना विरुध्द पाटोदेकर सुरक्षित रहावे म्हणून लढतायेत.आपण सर्वांनी पोलीस यंत्रणा,आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या.पण एक पाटोदकर म्हणुन सुनील जावळे साठी आपण टाळ्या वाजवून आपले कर्तव्य पुर्ण करुयात.