कोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजलातूर जिल्हाविशेष बातमी

पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी सामाजिक बांधिलकीतून १ महिन्याचा पगार दिला 'कोरोना निधी' साठी

लातूर:आठवडा विशेष टीम―औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पी एस आय अमोल गुंडे यांनी आपली प्रशासकीय सेवा सांभाळून सामाजिक बांधीलकी जपत आपण समाजाचे काही तरी देने लागत असून या कर्तव्या तून त्यांनी आपला एक महिन्याच्या पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये देणार असल्याचे जाहीर केले आहे तर पी एस आय म्हणून मी देश सेवा हे माझ्या कर्तव्य आहे ही माझ्या जीवनातील एक देश सेवा व एक सामाजिक बांधिलकी ची दुहेरी सेवा करण्याची मला प्रथमच संधी मिळाली आहे.
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र पोलीस जनतेसोबत ठाम उभे आहेत.एक महाराष्ट्र पोलीस अधिकारी म्हणून एक सामाजिक कर्तव्य म्हणून पी एस आय अमोल गुंडे यांचा आदर्श महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उद्योगपती दानशूर व्यक्तींनी घेवून देशात पसरलेल्या कोरोणा व्हायरस ला समुळ नष्ट करण्यासाठी राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता निधी कार्यासाठी आपलाही हातभार लागावा असेही आवाहन केले आहेत. महाराष्ट्र पोलीस प्रशासनातील लातुर जिल्ह्यातील किल्लारी पोलीस स्टेशनचे पीएसआय अमोल गुंडे यांनी कोरोना विरोधी लढ्यासाठी आपले एक महिन्यांचे आपले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये देवून प्रशासनासमोर एक आदर्श निर्माण केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे .कोरोना ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीसारखी पावलं उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असल्याने शेती व उद्योग धंद्यावर देखील मोठे संकट ओढवले असताना प्रशासनातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणारे पीएसआय अमोल गुंडे यांचे औसा तालुक्यासह परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर औसा तालुक्यात पोलिस प्रशासनात सेवा करणारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे पहिलेच व्यक्ती म्हणून आहेत अशी चर्चा सर्वत्र होत आहे.