कोरोना विषाणू - Covid 19जळगाव जिल्हा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना वित्त आयोग निधीमधून फवारणी साहित्य खरेदी मुभा ; खा.उन्मेश दादा पाटील यांनी अधिकाऱ्यांशी केली चर्चा

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी "कोरोना" संदर्भात अधिकाऱ्यांशी केली चर्चा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना वित्त आयोग निधीमधून फवारणी साहित्य खरेदी मुभा तसेच केंद्राने घोषित केलेल्या अन्न धान्य पुरवठा नियोजन , तसेच खासदार निधीतुन कोरोनाबाबत वैद्यकीय सुविधा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात केली चर्चा


जळगाव:आठवडा विशेष टीम― कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी
जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजना तसेच केंद्राने घोषित केलेल्या अन्न धान्य पुरवठा नियोजन लवकर व्हावे, उज्वला योजनेतून गॅस सिलिंडर पुरवठा तसेच जिल्ह्यातील अ ब क नगरपरिषदाना व महानगरपालिका यांना वित्त आयोगाच्या निधीतून पंधरा लाख,दहा लाख आणि पाच लाख रुपये औषधी फवारणी आदी कामासाठी खर्चाची मुभा, तसेच औषधी फवारणी करीता ग्रामपंचायतींना वित्त आयोगाच्या निधीतून करावयाच्या उपाययोजना, कोरोनाच्या बाबत खासदार निधीतुन कोरोनाबाबत वैद्यकीय सुविधा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती घेत चर्चा केली यावेळी जळगावचे आमदार राजू मामा भोळे,जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी घोषित केलेल्या एक लाख सत्तर हजार कोटींच्या विविध मदतीची तातडीने अंमलबजावणी व्हावी, तसेच कोरोनाबाबत जिल्हयातील आजची परिस्थिती काय आहे.त्याबाबत सुरू असलेल्या उपाययोजना जाणून घेत काही सूचना दिल्यात तसेच खासदार निधीतून करावयाच्या आवश्यक वैद्यकीय सेवा बाबत चर्चा झाली यावेळी उभयतांनी सोशल डिस्टन्स पाळत जिल्ह्यातील परिस्थितीवर सखोल माहिती जाणून घेतली.खासदार उन्मेश दादा पाटील यांनी लॉक डाऊन मध्ये नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे .शासकीय यंत्रणा सतर्क असून केंद्र सरकारने दिलेली मदत तात्काळ आपल्या पर्यंत पोहचविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली. त्यांचे समवेत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, माजी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे उपस्थित होते.