औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19सोयगाव तालुका

सोयगाव: गंगानगर/ घोसला ग्रामपंचायत कोरोनाला रोखण्यासाठी करतेय कठोर उपाय योजना ; गावात केलीय ३ वेळा जंतुनाशक फवारणी

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
राज्यातील कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या विविध उपाय योजना अंबलबजावणी करण्यात येत आहे. सरकार तर्फे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रत्येक गावात ग्राम समिती व ग्रामपंचायत यांच्या मध्यमधून गावात जंतुनाशक फवारणी करण्याचे काम सुरू आहे.
या गावातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आता पर्यंत ३ वेळा गावात जंतुनाशक फवारणी केली आहे.
घोसलागाव येथे गावात फवारणी करतांना गावाचे सरपंच प्रकाश पाटील, पोलिस पाटील, ग्रामसेवक, नवल पाटील, पिंटू पाटील,अनिल तडवी रविंद्र पाटील यांच्या सह इतर ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी हजर होते.
तसेच गावातील जनतेला वारंवार सूचना देण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन गावाचे सरपंच व पोलिस पाटील करतांना दिसून येत आहे.
वेळोवेळी गावात चौकात,गल्ली बोळात कोरोना विषाणू विषयी जनजागृती करण्याचे काम सरपंच,पोलिस पाटील,ग्रामसेवक व इतर सर्व शासकीय कर्मचारी करतांना दिसत आहे.