सोयगाव:आपत्ती व्यवस्थापनासाठी सोयगाव आगार सज्ज ; जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत धावणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या बसेसचे निर्जंतुकीकरण

सोयगाव,दि.३१:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत विदेशी पर्यटकांना घेवून धावणाऱ्या वातानुकुलीत बसेस विदेशी पर्यटकांच्या स्पर्शाने दुषित झाल्याने सोयगाव आगारात तातडीने या बसेस बोलावून त्यांचे तातडीने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.आगारातील उर्वरित बसेस आपत्ती निवारण स्थितीसाठी सज्ज करण्यात आल्या आहे.
लॉकडाऊनच्या स्थितीमुळे सोयगाव आगाराच्या बसेस आगारातच उभ्या करण्यात आल्या असून या बसेस आपत्ती निवारण परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज करण्यात आल्या आहे.सोयगाव आगाराच्या चाळीस बसेस कोरोना संसर्गाशी दोन हात करण्यात सज्ज करण्यात आलेल्या आहे.त्यातच अजिंठा लेणीत विदेशी पर्यटकांना घेवून धावणाऱ्या वातानुकुलीत बसेसचे तातडीने निर्जुतुकीकरण करण्यात आले असून या बसेसही आपत्ती निवारण स्थितीवर मार करण्यासाठी सज्ज करण्यात आल्या असल्याने कोरोना संसार्गावर मात करण्यासाठी सोयगावला प्रशासन सज्ज झाले आहे.

Previous post परळी: तहसीलदारांची विटभट्टयांवर धडक कारवाई ; ३ विटभट्टी मालकांविरोधात गुन्हा दाखल
Next post लिंबागणेश येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत गर्दी ,ग्राहक केंद्राची असुविधा ,जिल्हाधिकारी यांच्याकडेच तक्रार –डॉ.गणेश ढवळे