कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

लिंबागणेश येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत गर्दी ,ग्राहक केंद्राची असुविधा ,जिल्हाधिकारी यांच्याकडेच तक्रार –डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―बीड जिल्हाधिकारी राहुलजी रेखावार यांनी ग्रामिण भागातील लोकांना पैशांची कमतरता भासु नये व लोकांनी ब्यांकेत गर्दी करू नये आणि कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढु नये यासाठी महाराष्ट्र ग्रामीण ब्यांकेतील व्यवहार बंद ठेवून ग्राहक केंद्र मार्फत पैसै काढणे व भरण्याचे आदेश दिले आहेत.परंतु ग्राहक केंद्र यांनी असुविधा दिल्याने पुन्हा लिंबागणेश शाखेतील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत गर्दी झाली होती.

रोहीत कुसलकर आणि सतिश धपाळ ( महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील अधिकारी)

लिंबागणेश येथिल महाराष्ट्र ग्रामिण ब्यांकेने ४ ग्राहक केंद्राची नेमणूक केली आहे १) जयसिंह भोसले ( बोरखेड आणि लिंबागणेश ) २) जयदेव गिरे ( लिंबागणेश ) ३) रामराव वायभट (पिंपरनई ) ४) सतिश करडुले ( अंजनवती ). केली आहे. ग्राहकांनी ब्यांकेत गर्दी करु नये , ग्राहक केंद्राची मदत घ्यावी असे सांगून सुद्धा ब्यांकेतच गर्दी केली जाते.

जयसिंह भोसले वक्रांगी ग्राहक केंद्रांचे मालक:

माझ्याकडे केवळ लिंबागणेशच नाहीतर बोरखेड , अंजनवती , वडवाडी , महाजनवाडी ,वाघिरा या गावातील लोक येतात.ईतर ग्राहक केंद्रांनी सुविधा उपलब्ध करुन न दिल्याने माझ्या एकट्यावर ताण पडतो, तरीसुद्धा मी दिवसभर माझ्या बोरखेड येथिल निवासस्थानी लोकांना पैशांची देवाणघेवाण करतो.

जिल्हाधिकारी साहेबांनी ग्राहक केंद्रानी सुविधा न दिल्यास ग्राहक केंद्राची मान्यता रद्द करावी― डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

लिंबागणेश येथिल महाराष्ट्र ग्रामीण बँकेने अधिकृत केलेल्या वक्रांगी ग्राहक केंद्र वगळता ईतर ३ केंद्र लोकांना तत्पर सुविधा देत नसल्याने ब्यांकेत गर्दी वाढली आहे, त्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढण्याणा धोका निर्माण होऊ शकतो.त्यामूळे योग्य आणि तत्पर सेवा , सुविधा उपलब्ध करून देण्यास सक्षम नसणा-या ग्राहक केंद्रांची मान्यता रद्दबातल करावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सोडीयम हायपोक्लोराईट या द्रावणाने फवारणी केली : डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

लिंबागणेश महाराष्ट्र ग्रामिण ब्यांकेतील शाखेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे व भविष्यात कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी डॉ.गणेश ढवळे यांनी ब्यांकेसमोरील पाय-या , स्टीलचे पाईप , शटर , लोखंडी गेट ,कडी,कोंडे , कुलुप याठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने फवारणी केली .