औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये– गुलाबराव पाटील कोलते यांचे आवाहन

सावळदबारा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―लाॅकडाऊन मध्ये सहकार्य करा कोरोना व्हायरसाला जर हरवायाचे असेल तर घरी रहा हेच एक मात्र उपाय आहे असे आवाहन शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते यांनी केले आहे.आज देशात कोरोना व्हायरस सारखा भयंकर रोग पसरत आहे त्यामुळे सपूर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहेत या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये कोरोना व्हायरसला जर हरवायाचे असेल तर घरी रहा हेच एक मात्र उपाय आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण घरीच थांबावे कोणीही बाहेर फिरू नये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वानी विचार करून घरी थांबून यासाठी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करावे आपण व आपल्या घरातील प्रत्येकाला बाहेर जाऊ देऊ नका स्वत: बरोबर आपण आपल्या परिवाराची सुरक्षितेची काळजी घेऊन प्रशासनला सहकार्य करावे परिसरातील गावा गावात बाहेरगाव वरून नागरिक आले आहेत त्यांनी तपासणी करून द्यावी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणीही घराबाहेर निघू नये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होऊ नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर निघू नये त्यामुळे नागरिकांनी सरकारला सहकार्य करून कोरोना रोखण्यासाठी घरातच राहावे असे आवाहन शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गुलाबराव पाटील कोलते यांनी केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?