अंबाजोगाई तालुकाकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमी

कोरोनाच्या कठीण दिवसांत अंबाजोगाई नगरपरिषदेची दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अंबाजोगाई नगरपालिकेने दिव्यांग कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून कोरोना साथजन्य आजाराच्या कठीण दिवसांत शहरातील तब्बल 501 दिव्यांग बांधवांना दिलासा देत त्यांचे खात्यावर ऑनलाईन 10 लक्ष 2 हजार रूपयांचे अर्थसहाय्य जमा करून मदतीचा हात दिला आहे.

अंबाजोगाई शहरातील दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते.तसेच स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले जाते.त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि दिव्यांग विद्यार्थी यांना प्रोत्साहन मिळावे या भूमिकेतून अंबाजोगाई नगर परिषद कार्य करीत आहे. अंबाजोगाई नगरपालिकेने दिव्यांग कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून कोरोना साथजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील तब्बल 501 दिव्यांग बांधवांना अशा कठीण काळात दिलासा देत त्यांचे बँक खात्यावर प्रत्येकी 2 हजार रूपये या प्रमाणे सुमारे 10 लक्ष 2 हजार रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करून ते ऑनलाईन जमा केले आहे अशी माहिती नगराध्यक्षा सौ.रचना सुरेशराव मोदी, उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,गटनेते राजकिशोर मोदी,मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांनी दिली आहे.

दिव्यांग बांधवांना कल्याणकारी योजनेतून सहकार्य

"दिव्यांगांना दिव्यांगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटले पाहिजे अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी अंबाजोगाई नगरपालिका कटिबद्ध आहे.दिव्यांग बांधवांना कल्याणकारी योजनेतून सहकार्य करण्याचे काम नगरपरिषद करीत आहे. पुढील काळात दिव्यांग बांधवांसाठी खुप काही करण्याची ईच्छा आहे. त्यामुळे शहरातील सर्व
दिव्यांग बांधवांनी आपली निराशा झटकून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व "मुकम् करोति वाचालम्,पंगूम् लघयते गिरीम्" ही म्हण प्रत्यक्षात आणून दाखवावी." ―राजकिशोर मोदी (गटनेते,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,नगर परिषद, अंबाजोगाई.)