अंबाजोगाई तालुकाकोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

खा.डॉ.प्रितमताई मुंडें कडून गंभीरेंचे कौतुक ; लॉकडाऊन मध्ये स्वारातीचे रूग्ण व नातेवाईकांना संजय गंभीरेंकडून मोफत भोजन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीडच्या खा.डॉ प्रितमताई मुंडे ह्या स्वता: कोरोना संकटात जिल्ह्याच्या सतत संपर्कात असून या काळात जिल्ह्यात गोरगरीब तथा गरजूंना मदत करणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना फोन लावून संपर्क साधत आहेत.अंबाजोगाई शहरात सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे हे मागच्या आठ दिवसांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत रोज स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रूग्ण व त्यांचे नातेवाईक अशा 300 लोकांना मोफत भोजन देत आहेत.त्यांच्या या लोकहिताच्या कार्याची दखल घेवून खा.डॉ.प्रितमताईंनी दखल घेत त्यांना फोन लावून कौतूक केले.शिवाय विधायक काम करतांना स्वता:च्या आरोग्याची काळजी घेण्याची सुचना ही केली.

संचारबंदीच्या काळात सर्व बाजारपेठ ठप्प असून हॉटेल बंद आहेत.अशा परिस्थितीत अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मदत व्हावी दिलासा मिळावा याच विधायक हेतूने येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे यांनी मागच्या आठ दिवसांपासून अन्नदान सुरु केले आहे. स्वःताच्या घरी दररोज स्वयंपाक करून दिवसाला किमान 300 गरजूंची भुक ते भागवित आहेत. दवाखान्यात उपचारासाठी असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक,शिवाय रस्त्यावरचे गरजू,गोरगरीब तथा मनोरूग्ण अशांना पोळी भाजी वाटप सुरू केले आहे.अंबाजोगाई मधील भाजपाचे जेष्ठ नेते रामचंद्र झंवर यांच्या साक्षीने व सहकार्याने हा उपक्रम चालू केल्यानंतर मित्र परिवार तथा अनेकांकडून सहकार्य मिळत आहे.त्यांनी सुरू केलेल्या कार्याचं कौतूक शहरात होत असून या संकटात अशा प्रकारे मानवी साखळी उभा करून मदत करण्याची गरज आहे. या संकटात जिल्हयात गोरगरीब व गरजूंना मदत करण्याच्या सुचना भाजपा नेत्या पंकजाताई व खा.डॉ. प्रितमताईंनी केल्यानंतर संपूर्ण जिल्हा भाजपात प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी,लोकप्रतिनिधी हे आपआपल्या पध्दतीने शक्य तिथे मदत करतांना दिसत आहेत.दरम्यान या पार्श्वभूमीवर खासदार कार्यकर्ता यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.कोणते पदाधिकारी कुठे काय ? करतात याची माहिती त्या जातीने घेत आहेत,जिल्हा प्रशासनाचा सतत संपर्कात आहेत.एवढेच नाही तर अनेकांना फोन करून त्या स्वःता संपर्क साधत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे यांच्या कार्याची दखल घेवून खासदारांनी त्यांना स्वत: फोन करून कामगिरीचे कौतूक केले. एवढेच नाही तर समाजकार्य करतांना प्रत्येकांनी आपली व आपल्या कुटूंबियांची काळजी घ्यावी अशा सुचना पण,त्यांनी यावेळी केल्या. मोफत भोजन वितरण करण्यासाठी संजय गंभीरे यांना विशाल मुंदडा,राजेश भिसे,विश्वदीप पवार,महेश पवार,राहूल काचरे,बालाजी शिंदे,राहुल कांबळे,धनंजय हावळे,आकाश भिसे,दत्ता पवार,बालाजी गोडसे,हर्षल लखेरा,विष्णू शर्मा,प्रविण भिसे,इब्राहिम पटेल,रवी काचरे,राहूल शेळके,विशाल भिसे,राजेश गुट्टे,मंगेश भिसे,ॠषिकेश शर्मा,रवी लाड यांचे सहकार्य लाभत आहे.