कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमी

झक मारली आणि जिल्ह्याबाहेरील हैदराबाद येथील लोकांना लिंबागणेश आठवले , शेवटी वर्गणी गोळा करून चौसाळा येथे पाठवले―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―आज सायंकाळी डॉ गणेश ढवळे यांना मुळुक येथिल सरपंच यांचा फोन आला, हैदराबाद येथील १२ युवक लिंबागणेशकडे राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंभा ते पाटोदा पायी चालत येत आहेत. त्यानंतर ढवळे यांनी त्यांची विचारपूस केली असता कळाले की त्यांचे जन्मगांव राजस्थान असुन व्यावसायानिमित्त हैदराबाद येथे गेले होते.कोणी हांटेल मध्ये वेटर , कोणी कापड दुकानात तर कोणी लेदरब्यांग विकण्याचा व्यावसाय करीत होते. कोरोना विषाणुच्या (कोव्हिड १९ ) आजारामुळे व्यावसाय बंद पडला. हैदराबाद येथुन कर्नाटक मार्गे ट्रकने आज दुपारी २ वाजता मांजरसुंभा चौकात त्यांना सोडले. त्यानंतर तेथे नाष्टा करून चालत चालत लिंबागणेश पर्यंत आले.डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लिंबागणेश येथिल पोलिस चौकी जमादार वाघमारे जी.बी.यांना फोन वरुन कल्पना दिली.
पोलिस कर्मचारी सोनावणे , राठोड आदिंनी त्यांना ताब्यात घेतले.आणि वरिष्ठ अधिकारी नेकनुर ठाणे सहायक पोलिस निरीक्षक पुंडगे यांना कळवले.

11:48 PM 01 April 2020: "आंबेकर साहेब चौसाळा येथे निघालो आहे म्हणून मला मेसेज पाठवला आहे."― डॉ गणेश ढवळे

जिल्हाधिकारी व्यवस्था करतो म्हणाले !

11:15 PM 01 April 2020: "हैदराबाद येथील बाबुसिंग यांना डॉ ढवळे यांनी जिल्हाधिकारी बीड मा.राहुलजी रेखावार साहेबांचा फोन नं दिला.
बाबुसिंग यांनी जिल्हाधिकारी बीड यांना फोन करून वस्तुस्थिती सांगितली.... जिल्हाधिकारी रेखावार साहेब तर यांना लवकर व्यवस्था करतो म्हणाले"


10:30 PM, 01 April 2020: हैदराबाद येथील लोकांना चौसाळा येथिल आदर्श कांलेज येथे ठेवले आहे.
त्यांचा आत्ता फोन डॉ ढवळे यांना आला होता
अजुनही त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही.. जेवणाची सोय तर खूप लांब....
बाबूसिंग त्यापैकी एक यांनी डॉ ढवळे यांना फोन केला आत्ताच
मो.नं. ६३०१४२१३५१
" मी तहसिलदार आंबेकर यांना व्हाट्सएप वर कळवले त्यांनी मेसेज पाहीला परंतु रिप्लाय नाही आला. " – डॉ ढवळे


तहसीलदार आंबेकर:

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तहसीलदार आंबेकर यांना फोनवरून कल्पना दिली असता त्यांनी चौसाळा येथील आदर्श विद्यालय येथे पाठवुन द्या तेथे मंडळ अधिकारी वंजारे पुढील व्यवस्था बघतिल असे सांगितले.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  पगारे तलाठी सज्जा लिंबागणेश :

  जिल्हा बंदी आदेशानुसार पकडलेल्या लोकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी सरपंच आणि ग्रामसे्वकांची आहे.त्यांनी व्यवस्था करावी.
  तलाठी पगारे मो.नं.९६८९६६९०९२

  तेलप ग्रामविकास अधिकारी लिंबागणेश :

  जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत आणि तलाठी या दोन्ही लोकांची जबाबदारी आहे, एकट्या ग्रामपंचायची नाही, मी उद्या लिंबागणेशला येतो.
  तेलप पी.जी.मो.नं.७५८८०४२४०५

  झक मारली आणि जिल्हा बंदी बाहेरील लोकांना पकडून प्रशासनाची मदत केली : डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

  डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर , गाडीभाडे वर्गणी गोळा करून दिले,जिल्हा बाहेरील पकडलेल्या लोकांना चौसाळा येथे सोडण्यासाठी , तलाठि पगारे यांना फोन केला , त्यांनी ग्रामसेवकावर जबाबदारी ढकलली, ग्रामसेवकाने तलाठी आणि ग्रामसेवक यांची संयुक्त जबाबदारी आहे म्हणाले.

  उपसरपंच शंकर वाणी , गणेश वाणी , माजी सरपंच बाळासाहेब मुळे यांनी वर्गणी करून गाडीभाडे भरून त्यांना चौसाळा येथे सोडले.

  डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ३०० ₹,उपसरपंच शंकर वाणी २०० ₹,गणेश वाणी २००₹ ,बाळासाहेब मुळे २०० रु अशी एकुण ९००₹ जीप वाहनचालक सतिश तागड यांना रोख दिले .
  त्या लोकांना अगोदरच शिवाजी शिंदे , चिंतामण ढास , आदि.ग्रामस्थांनी खाण्यासाठी बिस्किट पुडे , फरसाण , आदि.आणि पिण्याच्या पाण्याचा जार दीला होता.
  शेवटी निघताना त्यांच्या डोळ्यात अगतिकता आणि आसवं दिसली.डॉ ढवळे यांनी त्यांना अडवले म्हणून ३०० रु वर्गणी देऊन प्रायश्चित घेतले.आणि प्रशासनाचा कारभार बघुन आपोआपच डॉ ढवळे यांच्या तोंडातुन शब्द निघाले....झक मारली.... आणि..त्यांना अडवुन पोलिस प्रशासनाला कळवले.