जळगाव: ग्रामीण भागात शिल्लक शालेय पोषण आहार तांदूळ ,डाळी वाटपाचे वितरण सुरू

पालकांना विद्यार्थी समप्रमाण तांदूळ व डाळी व धान्यादी मालाचे आदिवासी वस्तीत मान्यवरांच्या हस्ते वितरण

जळगाव:आठवडा विशेष टीम―एरंडोल तालुक्यातील संपूर्ण आदिवासी वस्तीतील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गाला पूर तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे पालकांना झाले वितरण.

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार तसेच जिल्हा परिषद व तालुका शिक्षण विभागाच्या पत्रकान्वये एरंडोल तालुक्यातील आदिवासी वस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर या ठिकाणी पटावरील 29 विद्यार्थ्यां चे समप्रमाणात त्यांचे पालकांना शिल्लक तांदूळ डाळी व धान्य आदी मालाचे वितरण मान्यवर हस्ते करण्यात आले. जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एस अकला डे यांच्या 30 मार्च च्या आदेशाचे व एरंडोल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांचे पत्राची अंमलबजावणी दिनांक 1 एप्रिल 2020 रोजी मान्यवर ग्रामपंचायत सरपंच, प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आरिफ शेख ,ग्राम.सदस्य रामचंद्र मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भिल ,सुभाष भिल ,सुनील आप्पा भील, सखाराम सोनवणे आदींच्या हस्ते वितरण पंच व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते सोशल डिस्टन्स अंतर ठेवून पटावरील 29 पालकांना शिल्लक साठा समप्रमाणात वाटून सर्वांच्या सहकार्याने करण्यात आली. यावेळी सीमा सोनवणे, रेखा भिल ,अनिता पवार, राकेश माळी, मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझर कर आदींनी परिश्रम घेतले.

आदिवासी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर येथील पालकांना शिल्लक तांदूळ डाळी समप्रमाणात वाटप करताना सामाजिक कार्यकर्ते आरिफ दादा शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील, सुभाष दादा भील, सुनील भील,सखाराम सोनवणे आदीं मान्यवर.

यावेळी सर्वांनी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे अजून काही दिवस शिस्त व शांततेने तंतोतंत पालन करणे गरजेचे असून घरी रहा सुरक्षित रहा असा संदेश मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांनी दिला. राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील शिल्लक धान्य साठा शाळेत दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे पालकांना समप्रमाणात वाटप करण्याचा लोकाभिमुख निर्णय राज्य शासनाने घेऊन जनतेच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे म्हटले .सर्व घटक शासनाला मदत करण्यासाठी पुढाकार घेत असून सर्व जनतेने जनतेच्या आरोग्यासाठी आरोग्याचे व स्वच्छतेचे सर्व नियम पाळले पाहिजेत व आपण घरी राहूनच शासनाला मदत करू शकतो म्हणून आपण देखील राज्य शासनाच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे व कोणीच घर सोडू नये कोरोना आजारावर आपण सर्वजण नक्कीच मात करू असे शाळेच्या वतीने आभार मानताना राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तथा प्रवक्ते व मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझर कर यांनी म्हटले.
एरंडोल तालुक्यात शालेय पोषण आहाराचा शिल्लक साठा वाटप करण्यासाठी तालुक्याचे गटविकास अधिकारी बी एस अकला डे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, पोलिस स्टेशनचे पीआय स्वप्नील ऊनवणे, ग्रामसेवक संघटनेचे सचिव आर एम पवार सर्व केंद्रप्रमुख,आ दि सर्व जणांनी सूचना निर्गमित केले आहेत.त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली आहे असे म्हटले.