कोरोना विषाणू - Covid 19पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमीशेतीविषयक

ऊसतोड मजुरांचा बीड जिल्ह्यात कोणी वाली राहिला नाही ; ऊसतोड मजुरांना आली स्व.गोपीनाथ मुंडेंची आठवण

स्व.गोपीनाथ मुंडे साहेब असतेतर आम्हाला हे दिवस पाहिला मिळाले नसते ऊसतोड मजुराना आली साहेबाची आठवण

पाटोदा:गणेश शेवाळे―बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांणा कोणी वाली राहिला नाही असच जिल्ह्यात पाहिला मिळत असून दोन दिवसां पासून पाटोदा तालुक्यातील पी व्ही पी कॉलेज मध्ये मजुर अडकले असून त्यांना सोडायला प्रशासन तयार नाही तर त्याची राहण्याची खाण्याची सोय नसल्याने उसतोड मजूर परिशान झाले आहेत बीड जिल्हातील मादळमोही येतील मजूराना तीन जिल्ह्यातून सोडले माञ बीड जिल्ह्यातच आल्यावर प्रशासनाने आडवून ठेवले सदर मजुर प्रशासनला म्हणते आमच्या तपासण्या करा काही अडचण आली तर आम्हाला हिते ठेवा नाहीतर आम्हाला जाऊद्या आम्ही लिहून देतो घरी गेलोतरी वीस दिवस राणातच राहु गावात जात नाही तरी त्यांना कोणी सोडायला तयार नाही यामुळे अडकुण पडलेले ऊसतोड कामगार,महिला, लहान मुले कोणी मदतीला येईल का यांची वाट पाहत असून आमच्याच जिल्ह्यात आम्हाला असे दिवस काढण्याची वेळ आलेली आहे हे पाहून ऊसतोड मजुर म्हणतात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असते तर आम्हाला हे दिवस पाहायला मिळाले नसते अशी चर्चा मजूरातून होत आहे तर साहेब स्वर्गवासी झाल्यानंतर बीड जिल्ह्यात ऊस तोड कामगारांचा कुणी वाली आहेका नाही असा मोठा प्रश्न जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना पडला आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?