कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

हैदराबाद येथील १२ जण चौसाळा येथे होम क्वारंटाईन ,तहसिलदारने केली बोलती बंद ;अशोकसेठ लोढा यांचे कार्यकर्ते संतोष ऊर्फ नाना नाईकवाडे बनले देवदुत

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―चौसाळा येथिलआदर्श विद्यालय येथे होम क्वारंटाईन करण्यात आले. रात्री ११ वाजेपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नव्हते.तेव्हा त्यांनी जिल्हाधिकारी बीड यांना फोनवर अडचण सांगितली.त्यानंतर तहसीलदार आंबेकर रात्रीं १२ वा.चौसाळा येथे भेट देऊन त्यांची प्रत्यक्ष मदत केली.

तहसीलदार आंबेकर यांनी केली बोलती बंद

तलाठी आणि ग्रामसेवक गाढव, नालायक आहेत तहसीलदार आंबेकर यांना रात्री डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी फोन करुन चौसाळ येथील हैदराबाद येथील १२ लोकांच्या पाणी आणि जेवणखानाची व्यवस्था करण्याची विनंती केली.जिल्हाधिकिरी यांना फोन केल्यामुळे तहसिलदार आंबेकर यांना रात्री १२ वा.चौसाळा येथे जावे लागले.आंबेकर यांनी मला फोन करून तुम्ही माझ्या सोबत चहा आणि जेवण घेऊन चला म्हणत जिल्हाधिकारी यांना फोन करण्यासाठी हैदराबाद येथील लोकांना फोन नंबर दिला म्हणून रागावले. मी आंबेकर यांना म्हणाल़ो तलाठी पगारे आणि ग्रामविकास अधिकारी तेलप यांच्यामधे कोणी आणि कुठे व्यवस्था करायची याबद्दल मतभेद आहेत, आपण त्यांच्यावर कठोर कारवाई का करत नाही तेव्हा आंबेकर साहेब म्हणाले तलाठी व ग्रामविकास अधिकारी गाढव व नालायक आहेत.परंतु तुम्ही समजदार आहात.तुम्ही त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करायची. आज सकाळी चौसाळा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पिण्याचे पाणी व खाण्यासाठी घेऊन गेलो असता रात्री तहसीलदार आंबेकर यांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यशी बोलण्यास , फोटो काढण्यास व व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई केली आहे.एवढेच नव्हे तर मी दिलेले खाण्याचे पदार्थ व पिण्याच्या पाण्याच्या बिसलरी बाटल्या घेण्यास नकार दिला.शेवटी तो आम्ही तेथिल ईतर बेंगलोर येथिल होम क्वारंटाईन यांना दिला.ईतकी दहशत आंबेकर तहसिलदार यांच्या रात्रीच्या भेटीनंतर दिसुन आली.

अशोक लोढा यांचे कार्यकते संतोष ऊर्फ नाना नाईकवाडे बनले देवदुत मो.नं.९७६७७८०२८७

चौसाळा येथे ३ दिवसांपासुन बेंगलोर येथिल ३५ लोकांना होम क्वारंटाईन करुन ठेवले आहे.त्यांची ,चहापानी आणि २ वेळ जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारची अशोक लोढा ,अध्यक्ष महावीर गोरक्षण संस्था चौसाळा हे गुरु गणेश मिसरी संस्था जैन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते व्यवस्थापक म्हणून संतोष ऊर्फ नाना नाईकवाडे करतात.संस्थेतील कर्मचारी स्वयंपाक करून २ वेळेस भरपेट जेवण , लहान मुलांना दुध तसेच पिण्याचे पाणी यासाठी जारचे पाणी उपलब्ध करून दीले आहे. नाना नाईकवाडे केवळ येथिल होम क्वारंटाईन ३५ लोकांनाच नव्हे तर अनाथांना २ वेळचं जेवण घरपोच डबे पोहचुन करतात.एवढेच नव्हे तर सरकारी दवाखाना कर्मचारी, चेकपोस्ट वरील पोलिस कर्मचारी, होमगार्ड , पोलिस चौकी यांनाही संस्थेच्या माध्यमातून मोफत जेवण पुरवतात एका अर्थाने चौसाळकरांसाठि देवदुत ठरले आहेत.

लिंबागणेश येथिल तलाठी पगारे आणि ग्रामविकास अधिकारी तेलप यांनी पुर्व सुचना न दिल्याने गैरसोय झाली : तलाठी ढाकणे

चौसाळा येथिल तलाठी ढाकणे यांनी रात्री १ वा.हैदराबाद येथिल होम क्वारंटाईन लोकांची विचारपुस केली.त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दीले.अचानक पुर्व सुचना लिंबागणेश येथिल तलाठी व ग्रामसेवक यांनी न दिल्याने त्यांची पिण्याचे पाणी व जेवणाची गैरसोय रात्री झाली.