कार्यक्रमबीड जिल्हामहाराष्ट्र राज्यसामाजिक

३ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाईत मराठा समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय महामेळावा

महामेळाव्यास मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-स्वागताध्यक्ष दत्ताञय पाटील

आठवडा विशेष|प्रतिनिधी

अंबाजोगाई :मराठा समाजातील वधु- वर व पालक परिचय महामेळाव्याचे आयोजन रविवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता साधना मंगल कार्यालय,साखर कारखाना रोड, अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी करण्यात आले आहे.या महामेळाव्याचे उदघाटन मा.खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते होईल तर या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ.अमरसिंह पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या महामेळाव्यास मराठा समाजातील इच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांनी तसेच मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष दत्तात्रय (आबा) पाटील यांनी केले आहे.

अंबाजोगाईतील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्था,संचलित रेशिमगाठी मराठा वधु- वर सुचक केंद्रामार्फत रविवार,दिनांक ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता साधना मंगल कार्यालय, साखर कारखाना रोड अंबाजोगाई (जि.बीड) या ठिकाणी मराठा समाजातील इच्छुक वधू-वर व पालकांचा परिचय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. महामेळाव्याचे उदघाटन राज्यसभेचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील (सोलापूर) यांच्या हस्ते होईल.तर या महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अमरसिंह पंडित (गेवराई) हे असतील.यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून दत्तात्रय (आबा) पाटील

(माजी सभापती, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती) तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार संग्रामभैय्या जगताप (अहमदनगर),
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर (केज), येडेश्वरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंगबप्पा सोनवणे

(केज),नॅचरल शुगर समूहाचे चेअरमन डॉ.बी.बी.ठोंबरे (रांजणी),जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे(लातूर),छत्रपती राजश्री शाहू बँकेचे चेअरमन अर्जुनराव जाहेर पाटील (बीड),परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेशदादा विटेकर (परभणी),तहसिलदार विद्याचरण कडवकर (परभणी),केज नगरपंचायतचे अध्यक्ष आदित्यदादा पाटील (केज),नगरसेवक बबनभैय्या लोमटे (न.प.अंबाजोगाई),बीड जिल्हा परिषद सदस्य शंकरराव उबाळे (अंबाजोगाई),पंचायत समितीचे उपसभापती तानाजीराव देशमुख (अंबाजोगाई) ,मराठा सेवा संघाचे अंकुशराव मोरे,पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजीव साठे पाटील (औरंगाबाद) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या महामेळाव्यात नियोजित वधु-वर यांचा परिचय,पालकांची ओळख व वधु-वर यांच्या परिचयपञाचे (बायोडाटा) अदान-प्रदान व परिचय होईल. महामेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे.महामेळाव्याच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. रेशिमगाठी मराठा वधू -वर सुचक केंद्र,सर्व सकल मराठा समाज बांधव,मराठा सेवा संघ,मराठा महासंघ यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे महामेळाव्याच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेत आहेत.राज्यस्तरीय मराठा समाजातील वधू वर व पालक परिचय महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा महामेळाव्याचे स्वागताध्यक्ष दत्तात्रय (आबा) पाटील, रेशिमगाठी मराठा वधू-वर सुचक केंद्राचे भरतराव पतंगे (अध्यक्ष),अरूणराव काळे (उपाध्यक्ष),गणेश पतंगे (सचिव), रघुनाथराव जगताप (सहसचिव),दत्ताञय कदम (कोषाध्यक्ष), सदाशिवराव सोनवणे (सदस्य),रामकिशन बडे (सदस्य) आदींनी केले आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.