औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19क्राईमसोयगाव तालुका

सोयगाव शहरात लाँकडाउन चे उल्लंघन करणाऱ्या दोघांना पाचशे रुपये दंड व तीन दिवस कैद ,सोयगावात पहिली शिक्षा

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोणा विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी लागु करण्यात आलेल्या लाँकडाउन चे उल्लंघन करणा-या दोघांना शुक्रवारी मा.न्यायालयाने ५०० रु दंड व दंड न भरल्यास तीन दिवस कैद शिक्षा सुनावली आहे.
संचारबंदीच्या काळात पोलीसाच्या वतीने नागरिकांना वारंवार सांगुन व आवाहन करुन देखील नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसुन येत असल्यामुळे मा.श्रीमती मोक्षदा पाटील,(पोलीस अधीक्षक,औरंगाबाद ग्रामीण).मा.श्री.सुदर्शन मुंडे उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली
सोयगाव पोलीस ठाण्याच्या वतीने(ता.२)सोयगाव शहरात लॉक डाऊनचे पालन न करणाऱ्या व मा.जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचे कोरोणा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी संचार बंदी आदेश लागु असतांना शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दोघांचे विरुद्ध कलम १८८ भादवी प्रमाणे सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी शुक्रवारी सदर गुन्ह्यातील दोघांना मा.न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास तीन दिवस साधी कैद सुनावली आहे.

सदर शिक्षा किरकोळ वाटत असली तरी या व्यक्तींना भविष्यात चारित्र्य पडताळणी मध्ये शिक्षा झाली म्हणून कोणत्याही शासकीय व खाजगी नोकरी मिळणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून त्यामुळे पोलीस कारवाई टाळण्यासाठी व कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या स्वतःच्या घरात बसून लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.असे आवाहन पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी केले आहे.

Back to top button