ब्रेकिंग न्युज

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यात मिळणार ४४७.०३ मेट्रिक टन मोफत धान्य ; तहसीलदार पांडे यांची माहिती

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या स्थितीमुळे मजुरांची आणि सर्वसामान्यांची परवड होवू नये यासाठी सोयगाव तालुक्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना पहिल्या टप्प्यात मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.यासाठीची पूर्तता झाली असून तालुका पुरवठा विभागाची पूर्वतयारीही झाली असल्याची त्यांनी सांगितले.
राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाची संचारबंदी आणि लॉकडाऊन सध्या सुरु आहे.त्यामुळे घराबाहेर न पडण्याबाबत प्रशासनाची जनजागृती हाती घेण्यात आली असतांना मजूरवर्ग आणि सर्वसामान्य कुटुंबाची अशा स्थितीत परवड होवू नये यासाठी दि.१० पर्यंत मोफत तांदूळ वितरण करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब या शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.या दोन योजनेसाठी लागणारा ४४७.०३ मेट्रिक टन तांदुळाची मागणी करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात तांदूळ उपलब्ध झाला असून एप्रिल महिन्याच्या नियमितच्या वितरणात मानसी पाच किलो याप्रमाणे हा तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.गहूची मागणी करण्यात आली असून गहू प्राप्त होताच वितरण करण्यात येणार असल्याने सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोफत धान्य वितरणाची पूर्वतयारी झालेली आहे.पुरवठा अधिकारी नाना मोरे,नायब तहसीलदार शेख मकसूद,पुरवठा निरीक्षक कोकिळा बांगरे आदी पुढाकार घेत आहे.