औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19सामाजिकसोयगाव तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रंगनाथ नाना काळे यांच्या वतीने गरजू १०० कुटुंबांना १ महिन्याचा किराणा सामानाचे वाटप

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते माजी जि प अध्यक्ष रंगनाथ नांना काळे यांच्या वतीने गरजू शंभर कुटुंबांना एका महिन्याचा किराणा सामानाचे आज वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणू चा प्रसार थांबविन्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असल्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे सोयगाव परिसरातील शंभर गरजू कुटुंबियांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते माजी जि प अध्यक्ष रंगनाथ नांना काळे यांच्या वतीने एक महिन्याचा किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र आहीरे , शहराध्यक्ष रविंद्र काळे , युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र दुतोंडे , सुधीर पठाडे , विजय काळे , योगेश बोखारे ,विवेक महाजन , प्रमोद वाणखेडे , दिपक देशमुख , कैलास इंगळे , दत्तू निकम , दत्तू सोनवणे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

फोटो सोयगांव येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते माजी जि प अध्यक्ष यांच्या वतीने गरजूंना किराणा सामान वाटप करतांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?