पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजशेतीविषयक

पाटोदा: ऊसतोड कामगारांच्या समस्यांच्या जागृतीसाठी दत्ता हुले या युवकाचे प्रयत्न …!

बीड:आठवडा विशेष टीम―राज्याभरात जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, व याच परिस्थितीला आपल्या जिल्ह्यातील बीड व लगतच्या जालना, परभणी, अहमदनगर जिल्ह्यातील ऊसतोड कामगार सामोरे जात आहेत, त्यांच्या मदतीसाठी मी गेल्या २५ तारखेपासून दत्ता हुले सजग ऊसतोड मजुर पुत्र म्हणून काम करत आहे, पालकमंत्री धंनजय मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, मा.प्रकाश आघाव (जिल्हा कामगार नोडल अधिकारी) त्याचबरोबर कामगार मंत्री, राज्यमंत्री, आमदार रोहित दादा पवार (शुगर असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष),कामगार नेते डी.एल.कराड,कामगार नेते मोहन जाधव,पाटोदा नगरपंचायत, पाटोदा तहसीलदार,जिल्ह्यातील सजग पत्रकार मंडळी,सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व प्रशासनातील मंडळी यांच्या संपर्कात आहे.
तो कुठला नेता,कार्यकर्ता किंवा तत्सम पक्षाचा पदाअधिकारी नाही तर एक सर्वसामान्य ऊसतोड मजुरांचा मुलगा म्हणून गेले अनेक वर्षे या सिस्टीममध्ये काम करत आहे, त्यामुळे त्यांचे हाल परिस्थिती लक्षात घेऊन शक्य होईल ती मदत सर्वांच्या संपर्कातून करण्याचा प्रयत्न करत आहे. फेसबुक व्हास्अँप, ट्विटर, वेब पोर्टल, व फेसबुक पेज या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह येऊन विनंती करून त्याचबरोबर व्हिडीओ बनवून त्यांना मदत व साखर कारखाना व स्थानिक प्रशासन यांच्यापर्यत ही माहिती पोहचवण्यासाठी जनजागृती करत आहे.
जेव्हा राज्यात सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ होऊ लागली तेव्हा हुले याने पालकमंत्री यांचा मदतपर कॉल करून राज्य सरकारने मजुरांना आरोग्य सेवा व सामाजिक सुरक्षा व व्यवस्था करण्याचे आवाहन केले होते, या आव्हानाला पालकमंत्री मोहद्ययांनी तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा पवार व साखर आयुक यांना विनंती पत्र लिहून दोन दिवसात शासनान निर्णय काढून मजुरांना दिलासा देण्याचे काम केले आहे आहे.
दत्ता हुले स्वतः एक ऑटोमोबाईल इंजिनिर असून पुणे येथे नोकरी करत आहे सध्या तो होम क्वारांटाईनचा शिक्का मारलेला असल्याने तो घराबाहेर येऊ शकत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे, तो आहे त्याच ठिकाणी राहून ऊसतोड कामगार यांना मदत व होईल ते प्रशासकीय सहकार्य करत आहे.त्यामुळे त्याच्या या प्रयत्नांचे कार्यचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.