बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीशेतीविषयक

कोरोनाने दुध डेअरी धारक सलाईनवर ,दुधउत्पादक आर्थिक विवंचनेत, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत दुधडेअरी मालकांच्या अडचणीत आणखी भर पडली असुन दररोज संघाने दुध न नेल्यामुळे दुधउत्पादकांना मोठ्या आथिंक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    शिवाजी वाणी ( दुध डेअरी मालक ):-
    नियमित संघाने नियमित दूध घ्यावे, ३-४ दिवसातुन एकदा दुध संघावर जाते,दुधउत्पादक आथिंक अडचणीत असल्यामुळे पैसे मागतात परंतु ब्यांक दररोज केवळ १०,००० रु.देत आहेत, आणि पेमेंट १० दिवसाला २ लाख रु.वाटावे लागतात.त्यामुळे दुधउत्पादक नाराज होतात.

    पांडुरंग वाणी :- सरकी पेंड आणि कडबा यांचे भाव गगनाला भिडले आहेत,दुधाचे भाव २५ रु आणि सरकीचे भाव १६०० रु, कडबा पेंडी २०रु.कसा ताळमेळ बसायचा, भाववाढीमुळे खुराक चारायचाच बंद केला कारण खुराक चारूनही दररोज दुध जात नाही.

    डॉ.गणेश ढवळे :- जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार दुधडेअरी मालक आणि दुधउत्पादक कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत प्रशासनासोबत आहेत. दुधसंघाने नियमितपणे दुधडेअरी वरून दुध घेणे प्रशासनाने बंधनकारक केले पाहिजे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दुधडेअरी मालकांना व्यावसायिक खातेधारकाला त्यांच्या खात्यातील आवश्यक ती रक्कम देण्यात यावी असे आदेश मा.राहुलजी रेखावार जिल्हाधिकारी बीड यांनी द्यावेत.आणि किसान पुत्र आंदोलणाचे प्रणेते अमिर हबिब यांनी भारत सरकारला वारंवार निर्देशित केलेले शेतक-यांना गळफास ठरलेले शेतकरी विरोधी कायदे , रद्द करण्यात यावं अशी विनंती किसानसभा बीड तालुकाध्यक्ष आणि किसान पुत्र आंदोलक डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.