लातूर : जितसिंग जुन्नी ,सुरजितसिंग जुन्नी यांच्यातर्फे कुटुंबांना अन्नधान्य , किराणासामान वाटप

लातूर:आठवडा विशेष टीम― जगभरासह भारतात वाढत्या कोरोना च्या रुग्णाच्या आकड्याने भारत सरकार ने १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेकांवर भूकमारीची वेळ आली अश्या बातम्याही व्हायरल झाल्या त्यासाठी सरकारने देखील स्वयंसेवी संस्था,सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत अन्नपुरवठा बऱ्याच ठिकाणी केला आहे.त्याचधर्तीवर पाऊल ठेऊन लातूर येथील जितसिंग जुन्नी ,सुरजितसिंग जुन्नी सह सहकाऱ्यांनी लातूर येथील सिकलकरी समजातील लोकांना गहू , भात , दाळ , साखर ,तेल सह किराणा, जीवनावश्यक अन्नधान्य देण्यात आले.