पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणविशेष बातमीसामाजिक

पंकजाताई मुंडे यांची कृपा , नव्या सरकारचा शाप आणि ग्रामपंचायतीच्या मागे शनिची साडेसाती , सामाजिक कार्यकर्ते साडेसाती घालवण्यासाठी कटीबद्ध– डॉ.गणेश ढवळे

वाघिरा:आठवडा विशेष टीम― पंकजाताई मुंढे ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री बीड असताना बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांसाठी २६१०कोटी ९९लाख रू.निधि सन२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावातर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या योजनेनतर्गत अनुदान वितरण करण्यात आले होते.परंतु नविन सरकारने याकामासाठींचा निधिला मंजुरी दिली नाही.काही गावातील ग्रामपंचायतने कामे पूर्ण केली परंतु बिले मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात हेलपाटे मारावे लागतात.आधिकारी नविन सरकारने निधी मंजूर केल्यानंतर बघु असे म्हणतात त्यामुळे सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या सदस्यासोबतच ग्रामस्थांमधे नाराजी वाढली आहे.सामाजिक कार्यकतें डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी कोरोना प्रकरण संपुष्टात आल्यानंतर निधि मिळावा यासाठी संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा प्रशासनस्तरावर लोकशाही मार्गाने लढा सहकारी सुदाम तांदळे , शेख युनूस च-हाटा , श्रीकांत कवडे गोलांग्रीकर, विजय सुपेकर शिवणीकर ,युसुफभाई ,सय्यद इलियास बीडकर यांच्यासमवेत देण्यात येईल.

पाटोदा तालुक्यातील मौजे वाघिरा या गावात पंकजाताई मुंढे तत्कालीन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री बीड यांनी मंजुरी देण्यात आलेल्या दलित वस्ती मधिल खालिल कामे

  1. दलित वस्ती मधे पेव्हिंग ब्लांक बसवणे निविदा निधी २ लाख ५६ हजार ,२७२ रु.
  • दलित वस्ती मध्ये भागवत जोगदंड यांचे घर ते सतिश वाघमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे निविदा निधी
  • दलित वस्ती मध्ये चावडी ते लक्ष्मीआई मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता करणे निविदा निधी २ लाख ५६ हजार ५३६ रुपये

ही तीनही कामे २ महिन्यांपूर्वी झालेली असून सर्व शासकीय कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली आहेत परंतु नविन सरकारने निधि अडवुन धरल्यामुळे ग्रामपंचायतीच्या स्वत:च्या पैशातुन कामासाठी खर्च केल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.

ग्रामपंचायतने सर्व कामे २ महिन्यापुर्वीच दर्जेदार कामे केली असुन सर्व शासकीय कागदपत्रे शासकीय नियमानुसार अधिकारी यांच्या सेवाशुल्कासहीत पुर्ण करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात.आधिकारी नविन सरकारने वरील कामांसाठी मंजूर झालेल्या निधीला स्थगितीमुळे निधी उपलब्ध नाही.अशी उत्तरे दिली जातात.चांगली कामे करूनसुद्धा असा आर्थिक आणि त्याचबरोबर मानसिक ताण सहन करावा लागतो.

―ज्ञानोबा ऊर्फ माऊली जगदाळे ( सरपंच वाघिरा ): मो.नं.८८३०८४४३३७

वरील कामे कुठल्याही पारंपरिक गुत्तेदाराने केली नसुन गावात दर्जेदार कामे करावीत या चांगल्या भावनेने हात उसने पैसे घेऊन केलेली असताना या दुष्काळात आम्हाला मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास होत असुन भविष्यात गावांसाठी काही चांगले करताना शंभरदा विचार करण्याची वेळ आली आहे.त्यामळे सरकारने निधि अडवुन न धरता मंजुरी देण्यात आलेल्या व पुर्ण झालेल्या कामांचा निधी तात्काळ वितरीत करण्यात यावा.
―गणेश बावणे ग्रा.पं.स : मो.नं.८२०८१९२०११

"पंकजाताई मुंढे यांनी ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री बीड असताना ग्रामिण भागातील मुलभूत विकास कामांसाठी दीलेला नीधीस या नविन सरकारने स्थगिती ही राजकीय सुडबुद्धिने घेतलेला निर्णय ग्रामपंचायतीसाठी शाप ठरत असुन कामे करणा-यांच्या मागे शनिची साडेसाती सुरू झाल्याचा भास होत आहे. याप्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली सहकारी सुदाम तांदळे ,युनुस शेख , च-हाटा , श्रीकांत कवडे गोलांग्रीकर, विजय सुपेकर शिवणीकर, युसुफभाई, सय्यद इलियास तात्काळ कोरोना विषाणुचा नायनाट झाल्यानंतर लोकशाही मार्गाने लढा देत राहु."―डॉ.गणेश ढवळे : मो.नं.९४२००२७५७६

―डॉ.गणेश ढवळे : मो.नं.९४२००२७५७६