कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीसामाजिक

बीड: लिंबागणेश ग्रामपंचायतने स्व.अमोलशेठ गलधर यांचा वारसा जपला ; गरजुंना दिला आधार ,धान्य वाटप

बीड:आठवडा विशेष टीम―स्व.अमोलशेठ गलधर यांचा गरजुंना आधार देण्याचा वारसा लिंबागणेश ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.निकीताताई स्वप्निल गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निलभैय्या गलधर यांच्या पुढाकाराने कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार जिवन जगताना जयांना कोणाचा आधार नाही,ज्यांचे मूलं बाहेर गावी राहतात,जे वयोमानाने थकलेले आहेत, आणि ज्यांचे जगणे दररोजच्या कामावर अवलंबून असते अशा हातावर पोट भरणा-या मजूरांना त्यांयांच्याप्रति संवेदनशील मनाने माणुसकीच्या भावनेतून गहु , तांदूळ व भाजीपाला यांचे वाटप करण्यात आले.

स्वप्निलभैय्या गलधर , भाजपा तालुकाध्यक्ष : "कोरोनाने सर्व सामान्य माणसाला हतबल केले असले तरी स्व.अमोलशेठ गलधर यांचा निराधारांना आधार देण्याचे काम आधार युवा मंच व्दारे जिल्हाभर अमोल शेठचे चाहते वर्षभर करतच असतात.परंतु आज कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत सर्व ग्रामपंचायत लिंबागणेश आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्यासमवेत लिंबागणेशकर जिल्हाप्रशासनाचे आदेशानुसार वागत असून गरजुंना अल्पशी भेट म्हणून धान्य व भाजीपाला वाटप करण्यात आले."

डॉ.गणेश ढवळे: "लिंबागणेश ग्रामपंचायतने कोरोना विषाणुच्या विरोधातील लढाईत सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणाने फवारणी , सर्व नाल्यांची साफसफाई , गावातील चौकाचौकात हातधुण्यासाठी डेटांल साबण व पाणी , गावात थुंकणारांना ५०० रु.दंड आणि जनजागृती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ,लिंबागणेश पोलिस चौकी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने कोरोणाला हरवण्यासाठी जोरदार प्रयत्न सरपंच सौ.निकीताताई गलधर ,स्वप्निल भैय्या गलधर ,उपसरपंच शंकर वाणी , ग्रामविकास अधिकारी तेलप पी.जे.,ग्रां.पं.स.श्रीहरी निर्मळ, गणेश लिंबेकर, सुरेश ढवळे, समीर शेख, विलास जाधव, बाबासाहेब गायकवाड, लहु थोरात, अंकुश गिरे , ग्रां.पं.कर्मचारी जिवन मुळे, सुखदेव वाणी, गणेश थोरात , कोतवाल बाळुकाका थोरात ,मोहन कोटुळे ,शेख अख्तर, औदुंबर नाईकवाडे, उमेश वाणी ,केशव गिरे ,सुरज कदम, सचिन आगवान आदि.ग्रामस्थांच्या सहकार्याने गरजुंपर्यंत मदत पोहचवून सर्व.अमोलशेठ गलधर यांना एकप्रकारे आदरांजली वाहण्यात आली."