कार्यक्रमबीड जिल्हाशेतीविषयक

बीडच्या दुष्काळी परिषदेत चर्चा करण्यासाठी शेतकरी व कष्टकरी बांधावानी सामील व्हावे -भाई विष्णुपंत घोलप

दुष्काळावर मात करण्यासाठी मराठवाडा पातळीवरील दुष्काळी परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे आयोजन

आठवडा विशेष|प्रतिनिधी

पाटोदा : शासनाने दुष्काळ जाहीर करुन तीन महिने झाले तरी जनावरे (शेळ्या, मेंढ्या) यांच्या साठी चारा उपलब्ध नाही. मजुरांना काम मागितले तरी त्यांचा हाताला काम नाही. सन २०१८ चा खरीपाचा पिक विमा या वर अद्याप ही कुठला निर्णय झालेला नाही. पाणी मागितले तर टँकर लवकर मिळत नाही आणि दुष्काळावर आज कोणतेही अनुदान शेतकऱ्यांच्या पदरात मिळाले नाही.या व इतर बीड जिल्ह्यासहीत संपूर्ण मराठवाडयातील दुष्काळी समस्यावर चर्चा करण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या विधान सभेतील आदरणीय व्यक्तीमत्व मा. आमदार भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखालील व भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मा. भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार भाई विवेकानंद पाटील, माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सहचिटणीस भाई प्रविण (दादा) गायकवाड, आमदार भाई बाळाराम पाटील, आमदार भाई धैर्यशील पाटील, आमदार भाई पंडित पाटील, प्रा. भाई एस. व्ही. जाधव, माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, जेष्ठ नेते मा. आ. संपत पवार, मराठवाडा चिटणीस भाई काकासाहेब शिंदे, खजिनदार भाई राहुल पोकळे, अॅड भाई राजु कोरडे, जे. एस. म्हात्रे, मा लक्ष्मणराव गोळेगावकर, भाई चंद्रकांत देशमुख, भाई धनंजय पाटील, प्रा. दत्ता सोमवंशी, निरंतर प्रशिक्षण प्रमुख शेकाप भाई प्रा.उमाकांत राठोड, भाई प्रदीप जैन, आणि मराठवाडयातील सर्व जिल्हाचिटणिस, तालुका चिटणीस व इतर सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथे दुष्काळावर मात करण्यासाठी मराठवाडा पातळीवरील दुष्काळी परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे गुरुवारी दिनांक ३१ जानेवारी २०१९ रोजी दुपारी ठिक २ वाजता आयोजन केलेले आहे. तरी त्या साठी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी वर्ग आणि जो दुष्काळी परिस्थितीने पिचलेले आहे अशा सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहुन आप आपल्या भागातील, गावातील, परीसरातील, तालुक्यातील, जिल्ह्य़ातील व मराठवाडय़ातील ज्या काही समस्या असती त्या लेखी स्वरुपात दिल्या तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शासनाच्या निदर्शनास आणून दिले जाईल. त्यामुळे आपणास व आपल्या भागातील कामास न्याय मिळण्यासाठी सुकर होईल. असे आवाहन भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी प्रसिद्धीपञकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.