माळी समाजाचा तिरस्कार करणाऱ्या सरकारने माळी समाजाचे येणाऱ्या निवडणूकीत मतदान विसरावे – दिलीप रंधवे सावता सेना

मोदी सरकारने फुले दाम्पत्याला भारतरत्न तर फडवणीस सरकार माळी समाजाला मंत्री पद देण्यास जानुन बुजून विसरलेल्या सरकारला माळी समाज येणाऱ्या निवडणूकीत विसरणार
पाटोदा :ज्या वेळी मुलीना फक्त चुल आणी मुल येवढच करायची मुबा होती त्यावेळी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन पहिली मुलीची शाळा सुरू करुण स्त्रीयांना गुलाम गिरीच्या बेड्यातुन मुक्त करणारे थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले व विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा ही अखंड महाराष्ट्रातील जनतेची मागणी होती पण मोदी सरकारने ही मागणी पुर्ण केली नाही व महाराष्ट्रातील फडवणीस सरकारने सत्तेत येण्या आगोदर माळी समाजाला अनेक शब्द दिले होते पण सत्ता येऊन चार वर्षे झाले तरी माळी समाजाच्या जिव्हाळ्याचा एक पण ही प्रश्न सोडवला नाही यामध्ये प्रामुख्याने माळी समाजाचे दैवत संत श्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज मंदिर आरण येतील देवस्थानास ‘अ’ दर्जा द्यावा पण आज पर्यंत देण्यात आला नाही? तसेच पुणे येथील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित का केले नाही? तसेच सरकारमधील मंञीमंडळात माळी समाजातील एकाही लोकप्रतिनिधीला मंत्री मंडळात स्थान का दिले नाही यामुळे हे सरकार माळी समाजातील प्रश्नांना जाणून बुजून दुर्लक्ष करत असुन हे सरकार माळी समाजाचा द्वेष करत असुन माळी समाजाच्या मागण्या विसरलेल्या सरकारने येणाऱ्या निवडणूकीत माळी समाजाचे मतदान विसरावे असा इशारा सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप रंधवे यांनी प्रञकाद्वारे दिला आहे.