बीड जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारणशेतीविषयक

केंद्राच्या मदतीमुळे महाराष्ट्रातील शेतक-यांना मोठा दिलासा - ना. पंकजाताई मुंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

आठवडा विशेष|प्रतिनिधी

मुंबई दि. २९: केंद्र सरकारने ४ हजार ७१४ कोटी रुपयांची मदत करून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र व राज्यातील भाजपचे सरकारच शेतक-यांचे खरे तारणहार आहे हे या मदतीने सिध्द झाले आहे अशी प्रतिक्रिया राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आज देशातील विविध राज्यांना मदत जाहीर केली त्यात महाराष्ट्राला सर्वाधिक ४ हजार ७१४ कोटी रुपये जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे अशा परिस्थितीत त्यांना वेगवेगळ्या रूपाने मदतीचा हात सरकारने पुढे केला आहे. राज्य सरकारने नेहमीच शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आता केंद्र सरकार मदतीसाठी पुढे आल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगून ना. पंकजाताई मुंडे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.