औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

औरंगाबाद मधील सोयगाव तालुक्यात बाजरी पिकांवर उन्हाचा विषाणू ;बाजरी पिकांनी रंग बदलल्याने शेतकरी चिंतातूर

सोयगाव,ता.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोनाचा संसर्गाच्या नियंत्रणासाठी प्रशासन दिवसरात्र कामात गुंतले असतांना मात्र रब्बीच्या बाजरी पिकांवर ऐन कापणीच्या कालावधीत नवीन विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असून वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत सोयगाव तालुक्यातील रब्बीच्या बाजरी पिके जांभळा रंग परिधान करत असल्याचे चित्र सोमवार पासून आढळून आले आहे.या प्रकारामुळे सोमवारी बाजरी पिके कापणी साठी हातात घेण्याचे काम घेतली असता,हा नव्याने प्रकार आढळून आला आहे.
रब्बीच्या हंगामात सोयगाव तालुक्यात बाजरी आणि ज्वारी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती.परंतु ऐन कापणीच्या तोंडावर बाजरी पिकांवर जांभळ्या रंगाचा व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आल्याने कोरोना व्हायरस पाठोपाठ या नवीन व्हायरसला सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे.माणसांवरील कोरोना संसर्गा साठी आरोग्य,महसूल,आणि पंचायत समिती प्रशासन कामाला लागले असतांना दुसरीकडे मात्र बाजरी पिकांवरील उन्हाच्या तडाख्यात जांभळ्या रंगाच्या व्हायरस मुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.कापणीच्या तोंडावर आलेल्या बाजरीच्या पिकांनी जांभळा रंग परिधान केला असून उन्हाच्या तडाख्याने बाजरीच्या पिकांनी रंग बदलला असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून मात्र या बाजारीवरील प्रादुर्भावाबाबत कोणत्याही उपाय योजना हाती घेण्यास कृषी विभाग तयार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बाजारीवरील व्हायरस तालुक्यात चिंतेचा विषय-

बाजरी पिकांवर अचानक जांभळा रंग येवून बाजरीचे कणीस मात्र जोमदार आढळून येत आहे.मध्ये मात्र दाणे भरले नसल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले.यामुळे बाजारीवरील व्हायरस बाबत सोयगाव तालुकुयात चर्चेचा विषय ठरला आहे.