औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव: कंकराळा येथे ग्रामस्थरीय पथक तैनात

सोयगाव दि.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊनला सामोरे जात आहे. औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा गावातुन शेंदुर्णी, जळगाव जिल्ह्यात जाण्यासाठी बाह्यमार्ग आहे.जिल्हाबंदी असतांना सुद्धा यामार्गाने जास्त प्रमाणात वाहतूक सुरू आहे.राज्यामध्ये कोरोना संक्रमणाचा वाढता आकडा आहे या पार्श्वभूमीवर वाहतुक व‌ कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
जे आवश्यक सेवा असतील ते वगळून बाकी वाहनांना व विनाकारण संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करीत दुचाकीवरून तिहेरी प्रवास करणारे दुचाकीस्वार व इतर वाहनांना प्रवेश बंद करण्याचे ठरविले आहे. या ग्रामस्थरीय समितीत कुणाल राजपुत , पंडीत वाघ,राहुल बोराडे, गणेश राजपुत,गोकुळ राजपुत,आकाश मख, प्रताप राजपुत, बाळु पाटील , गोरख पवार आदींचा समावेश आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने निर्देशित केलेल्या आदेशाचे पालन करीत ग्रामपंचायत मार्फत गावात योग्य ती उपाय योजना सुरू केली असून स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
    –सौ.चंदाबाई राजपूत
    सरपंच कंकराळा