बीड: ३२ कोटी ठेवींचा टप्पा गाठणारी योगेश्वरी नागरी ठरली अंबाजोगाईतील पहिली पतसंस्था

सभासद,ठेवीदारांचा विश्वास ; योगेश्वरी पतसंस्थेने जमविल्या 32 कोटी 55 लक्ष रूपयांच्या ठेवी-चेअरमन माणिक वडवणकर,व्हाईस चेअरमन मनोज लखेरा यांची माहिती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― सहकार क्षेत्रात सभासद, ठेवीदार,ग्राहक व कर्जदार यांचा विश्वास सार्थ ठरवत प्रगतीकडे झेपावणा-या श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेनेे सुमारे 32 कोटी 55 लक्ष रूपयांहून अधिकच्या ठेवी जमवत दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. सर्वसामान्यांना भक्कम पाठबळ देणारी व एक आधारवड बनलेली ही पतसंस्था नवउद्योजकांसाठीही कायम आशेचा किरण बनलेली आहे.अंबाजोगाईच्या अर्थकारणाला गती व बळकटी देण्याचे काम आज ख-या अर्थाने योगेश्वरी नागरी पतसंस्था करीत आहे.अंबाजोगाईच्या सहकार क्षेत्रात 32 कोटी 55 लाखांहून अधिक ठेवींचा टप्पा गाठणारी योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही अंबाजोगाईतील पहिली पतसंस्था ठरली असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन माणिक वडवणकर व व्हाईस चेअरमन तथा नगरसेवक मनोज लखेरा यांनी दिली आहे.

श्री.योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चेअरमन माणिक वडवणकर व व्हाईस चेअमरन मनोज लखेरा यांनी सर्वप्रथम सभासदांनी वेळोवेळी केलेले सहकार्य व संचालक मंडळावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.वडवणकर बोलताना म्हणाले की,”सहकाराचे तत्व स्वयंरोजगाराला महत्व” हे ब्रीद घेवून व धोरण ठेवून सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेने सुरूवाती पासूनच बचतीच्या माध्यमातून लघु उद्योगांसाठी कर्ज देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम केेले आहे.ही पतसंस्था आज अंबाजोगाई शहराच्या व परिसरातील नागरिकांसाठी एकप्रकारे आधारवडच ठरली आहे.सन 1989 साली ही पतसंस्था अत्यल्प भागभांडवलावर सुरू झाली.तिचे आज ख-या अर्थाने वटवृक्षात रूपांतर झाले आहे.पतसंस्थेने स्थापनेचे रौप्य महोत्सवी वर्ष पुर्ण केले आहे.ही पतसंस्था आज सर्वसामान्यांसाठी ख-या अर्थाने आधारवडच बनली आहे.पुढील काळात नवउद्योजकांना आर्थिक आधार देण्याचे काम पतसंस्था करीत आहे.हे सांगत वडवणकर म्हणाले की,31मार्च 2020 अखेर पतसंस्थेची सभासद संख्या 2350 इतकी असून सभासद भागभांडवल 2 कोटी 32 लाख,स्वनिधी 5 कोटी 82 लाख एवढा आहे.पतसंस्थेकडे 32 कोटी 55 लाखांहून अधिकच्या ठेवी आहेत. पतसंस्थेने 22 कोटी 87 लाखांहून अधिकचे कर्ज वाटप केले आहे.तर 25 कोटी 72 लाख रूपयांहून अधिकची गुंतवणुक केली आहे.पतसंस्थेला 31 मार्च 2020 अखेर 27 लाख 39 हजार रूपयांहून अधिकचा निव्वळ नफा झाला आहे. पतसंस्थेची वैशिष्टये म्हणजे संगणकीकृत सेवा, नित्यनिधी ठेव,बचत ठेव,आवर्त ठेव, योगेश्वरी धनसमृद्धी ठेव,ठेवीवर आकर्षक व्याज दिले जाते. शहरातील छोटे-मोठे व्यापारी ज्यात बेकरी उद्योग,फळ भाजीपाला विक्रेते,लघु उद्योजक या व्यावसायिकांना योगेश्वरी पतसंस्था ही आपली बँकच वाटते.कारण,तशी ओळख या पतसंस्थेने निर्माण केलेली आहे.सामान्य माणसाला कर्ज वाटप करून पतसंस्थेने आर्थिक आधार दिला आहे. कर्जवसुली अभियान प्रभावीपणे राबवले आहे. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पल्स पोलीओ अभियानात सहभाग,गरीब व होतकरू,अपंग विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे,रक्तदान शिबीराचे आयोजन,मोफत आरोग्य शिबीर,वृक्षारोपण करून स्वच्छता व पर्यावरण विषयक जनजागृती, शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्‍यांचा वेळोवेळी गौरव,गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ व त्यांचा सत्कार, सामाजिक बांधिलकी मानुन काम करणे आदी उपक्रम ही पतसंस्था राबवत आहे. पतसंस्थेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पतसंस्थेच्या कार्यालयातच अधिकृत वीजबील भरणा केंद्र सुरू केले आहे.त्यास वीज ग्राहकांचा व पतसंस्थेच्या सर्वच सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पतसंस्थेच्या या यशात बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा पतसंस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे.तसेच सहाय्यक सहकार निबंधक
पोतंगले साहेब,सहकार अधिकारी जाधव साहेब यांनी वेळोवेळी पतसंस्थेस सहकार्य केले आहे. पतसंस्थेच्या सर्वांगीण वाटचालीत व विकासात नगरसेवक तथा व्हाईस चेअरमन मनोज लखेरा, संचालक तथा बीड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कचरूलाल सारडा, संचालक सुनिल वाघाळकर,ब्रह्मचारी इंगळे, दिलीप देशपांडे,रूपेश चव्हाण,शेख अब्दुल शेख करीम,सौ.वनमाला पुरुषोत्तम वाघ,सौ.रेखा लहू शिंदे,शिरीष भावठाणकर, सलिम गवळी यांच्यासहित पतसंस्थेचे व्यवस्थापक गजानन कुलकर्णी यांचेसह कर्मचारी लेखापाल संतोष मठपती,रोखपाल नारायण हाके,रोहीत वाघमारे, अनिकेत पानकोळी,रूपेश कोकाटे,दिपक आदमाने, कु.सिमा मुळे,सागर कंगळे, शिवराज काटे,पिग्मी प्रतिनिधी राम भस्मे,विजय गजरे,प्रकाश कदम,सतिष मठपती,विशाल देशमुख, अजय रापतवार,शेख सलिम यांच्या सहीत पतसंस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार,कर्जदार,खातेदार,
हितचिंतक,ग्राहक आदींचे सातत्याने सहकार्य लाभले असल्याची माहिती प्रसिध्दीपञकात देण्यात आली आहे.