जिजामाता महिला बचत गट तर्फे गरजू निराधार कुटूंबाना घरगुती साहित्य वाटप

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव शहरातील वाॅड क्रमांक १७ काळेनगर मध्ये जितामाता महिला बचत गटा तर्फे गरजू व निराधार कुटुंबाला काही जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले, भारतामध्ये कोरोना विषाणू मुळे लाॅकडाऊन मुळे भयानक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांना पोट भरण्यासाठी मोठा सामाना करावा लागत आहे, ज्या कुटुंब प्रमुखावर गरिबीची जिवन जगणारे हात मजूर अशा काही कुटुंबांना जिजामाता महिला बचत गटा तर्फे जिवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले, यावेळी गटाच्या अध्यक्ष मनिषा योगेश बोखारे व सचिव जिजाबाई वसंत पगारे तसेच वाॅड क्रमांक १७ चे नगरसेवका शोभाबाई संजय मोरे व गटातील सर्व महिलां सभासद उपस्थित होत्या,हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी योगेश बोखारे, वसंत पगारे आदीसह नागरिकांची मोठ्या उपस्थिती होते.