बीड जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळला ; आष्टी तालुक्यातील पिंपळा गावातील रुग्ण

आष्टी:आठवडा विशेष टीम―बीड जिल्ह्यातील आष्टी मध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. नगरच्या तब्लिगी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला हा रूग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णाचा संचार हा नगर जिल्ह्यात राहिला आहे. लॉकडाऊनच्या काळात हा बीड जिल्ह्यात त्याच्या मूळ गावी आला होता.कोरोना बाधिताला नगरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोविड-१९ झालेला रुग्ण आढळुन आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात इतरत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन फौजदारी प्रक्रीया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार आष्टी तालुक्यातील पिंपळा या गावापासुन ३ कि.मी.परिसरातील पिंपळगाव , धनगरवाडी , काकडवाडी ठोबळसांगवी व खरडगव्हाण हा परिसर कंटेंनमेंट झोन म्हणुन घोषीत करण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोन नंतर पुढील ४ कि.मी. परिसरातील लोणी नांदुर ,सोलापुरवाडी ,खुंटेफळ ,कोपाळ हि गावे बफर झोन म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.